'... तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीही राजीनामा देतील'

' खरं तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला नसता तर यांना फक्त तोंडाची हवा काढत बसावं लागलं असतं.'

मुंबई(प्रतिनिधी): शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता काही महिने होताहेत मात्र अजून त्यांच्यातली भांडणं पूर्णपणे मिटलेली नाहीत. वेगवेगळ्या कारणांवरून कुरबुरी सुरूच असल्याचं बाहेर येतंय. यावरूनच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला चांगलंच सुनावलंय. आत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भांडणं थांबवावीत. तुम्हाला सत्ता ही भांडण्यासाठी दिलेली नाही असं त्यांनी सुनावलं. बंगले, ऑफिस, मंत्रिपदं यावरून सध्या सरकारमध्ये भांडणं असल्याचं पुढे आलं होतं. त्यावरून त्यांनी एका कार्यक्रमात हा सल्ला देत एक गंभीर इशाराही दिलाय.


गडाख म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणामुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय. खरं तर काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे. त्यांनी सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला नसता तर यांना फक्त तोंडाची हवा काढत बसावं लागलं असतं असंही ते म्हणाले.


गडाख पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे हे काही राजकारणी नाहीत. मी त्यांना लहान असल्यापासून ओळखतो. ते कलाकार आहेत. ही भांडणं अशीच राहिलीत तर ते कधीही राजीनामा देऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेळीच सावध व्हावे असा सल्लाही त्यांनी दिला.


कामे सुरु होण्याआधीच नेते टक्केवारी मागतात, गडकरींच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ


सगळ्यात आधी मंत्रिमंडळ विस्तार, नंतर खातेवाटप, बंगल्यांचं वाटप, दालनांचं वाटप अशा अनेक कारणांवरून सरकारमधल्या नेत्यांची भांडणं चव्हाट्यावर आली होती. खातेवाटप काही दिवस रखडलं होतं. काँग्रेसकडे कमी महत्त्वाची खाती असल्याचं त्यांच्या नेत्यांना वाटप होतं. त्यामुळे वाद चव्हाट्यावर आले होते. त्यातच काँग्रेसचे नेते  विजय वडेट्टीवार हे खातेवाटप होऊन पाच दिवसापर्यंत नाराज होते. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला होता.


कामे सुरु होण्याआधीच नेते टक्केवारी मागतात, गडकरींच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ


काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहाणपणानं वागायला हवं, असं गडाख म्हणाले. 'उद्धव ठाकरे शब्द पाळणारा माणूस आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिक स्वास्थ द्यायचं असेल, तर दोन्ही काँग्रेसनं भांडणं कमी करायला हवीत. जरा शहाणपणानं वागायला हवं. म्हणजे हे सरकार चालेल,' असं गडाख यांनी म्हटलं. 'राज्यात आता ग्रामीण भागातलं सरकार आलेलं आहे. ग्रामीण भागातले प्रश्न सोडवायला तुम्हाला कशाला बंगले पाहिजे? कशाला कार्यालयं पाहिजेत? राहता कशाला मुंबईतल्या बंगल्यांमध्ये?', असे प्रश्न गडाख यांनी उपस्थित केले. मंत्र्यांनी लोकांमध्ये राहायचं असतं, हे कुणीतरी त्यांना सांगण्याची गरज आहे. ग्रामीण भागातलं सरकार असल्यानं ते चालावं अशी अपेक्षा ग्रामीण भागातील शेतकरी आणि बहुजनांची इच्छा असल्याचंदेखील गडाख यांनी सांगितलं.




संबंधित पोस्ट