मुंबईत पोलिसांनी उद्धवस्त केलं SEX रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटकमुंबईत पोलिसांनी उद्धवस्त केलं SEX रॅकेट, दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक
अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये अटक केल्याने बॉलिवूडमध्ये खशबळ उडाली आहे.
- by Reporter
- Jan 10, 2020
- 1496 views
मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील गोरेगाव परिसरातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी रॅकेटमध्ये सामील असलेल्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक केली आहे. अभिनेत्रींना सेक्स रॅकेटमध्ये अटक केल्याने बॉलिवूडमध्ये खशबळ उडाली आहे.
समतानगर येथील सीनिअर इन्स्पेक्टर राजूबाबू कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मध्यरात्री गोरेगाव पूर्वेतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये छापा मारला. खबऱ्याद्वारे पोलिसांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांमधील एका कर्मचाऱ्याने ग्राहक बनून सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्या तरुणीशी संपर्क केला.
त्यानंतर सेक्स रॅकेटसाठी पैसे स्वीकारतानाच पोलिसांनी तरुणीला अटक केली. नंतर ही तरुणी बॉलिवूड अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. 'सेक्स रॅकेटप्रकरणी 32 वर्षीय आणि 26 वर्षीय तरुणींना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्यावर याबाबत गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी धर्नेंद्र कांबळे यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणींपैकी एक जण बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाची गर्लफ्रेंड असल्याचीही माहिती आहे. या प्रकरणात पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत.
प्रेमभंगाची धक्कादायक आकडेवारी समोर, दररोज 4 मुलं करतात आत्महत्या
याआधीही समोर आलं बॉलिवूडचं सेक्स रॅकेट कनेक्शन
काही दिवसांपूर्वी सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखालीच बॉलिवूडमधील एका प्रॉडक्शन मॅनेजरला अटक करण्यात आली होती. मुंबईतील जुहू भागात एका 4 स्टार हॉटेलमध्ये रेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप या व्यक्तीवर केला गेला. झेड लक्झरी रेसिडेन्सी हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी प्रॉडक्शन मॅनेजर राजेशकुमार लाल याला अटक केली होती.
पोलिसांनी मारलेल्या छाप्यात उज्बेकिस्तानच्या दोन मुलींना या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं होतं. यापूर्वी 23 डिसेंबरला पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अशाच महिलांना ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी सांगितलं की त्यांना या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी या हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात झरीना नावाची एका परदेशी महिला राजेशकुमार लाल याच्या मदतीनं बाहेरच्या देशातून सेक्स रॅकेट चालवत होती. ही महिलाच तिथल्या परदेशी महिलांना या हॉटेलमध्ये पाठवते. त्या बदल्यात तिला प्रति ग्राहक 80 हजार रुपये मिळातात. राजेशकुमार लाल हा बॉलिवूडशी संबंधित असल्यानं या घटनेनंतर सगळीकडे मोठी खळबळ उडाली होती.
रिपोर्टर