
सात वृत्तपत्रांवर गुन्हा दाखल
भिवंडीत सात वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती...
- by Reporter
- Jan 08, 2020
- 854 views
ठाणे (प्रतिनिधी):भिवंडीत सात वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. परंतु, या मुलीची ओळख गुप्त न ठेवता तिचे नाव आणि फोटो प्रकाशित केल्याप्रकरणी सात वृत्तपत्रांचे संपादक आणि संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे वृत्तपत्रांवर गुन्हा दाखल झाल्याचे देशातील पहिलेच प्रकरण असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.
मुलीच्या बलात्कारानंतर झालेल्या हत्येचे प्रकरण डिसेंबर महिन्यातील असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटकही केली होती. याबाबतच्या बातम्याही प्रकाशित झाल्या होत्या. मात्र, काही वृत्तपत्रांनी मुलीचे नाव आणि फोटो प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित वृत्तपत्रांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार सात वृत्तपत्रांचे संपादक आणि संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर