
मुंबईत SEX रॅकेटचा पर्दाफाश, हे आहेत महत्त्वाचे अड्डे
पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे तीन मुली आढळून आल्यात. त्यात एक तरुणी ही पश्चिम बंगालची असल्याचं आढळून आलंय.
- by Reporter
- Jan 06, 2020
- 1879 views
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई शहरात बांगलादेश आणि पश्चिम बंगाल मधून मुलींना आणून त्यांना वेश्या व्यवसायात टाकून आर्थिक फायदा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखे तर्फे करण्यात आलाय. मात्र ह्या रॅकेट मागे कोण कोण आहेत ह्याचा शोध सुरू आहे. मुंबई हे अंतरराष्ट्रीय दर्जेचा शहर असला तरी मात्र ह्या शहरात अनधिकृत कामं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा अनेक वेळा समोर आलेलं आहे. असाच एक प्रकार समोर आहे ज्यामध्ये दलालांमार्फत भारतात पश्चिम बंगाल आणि बांगलादेश ह्या देशातून मुलींना मुंबईत आणून त्यांना वेश्या व्यवसायात ढकलला जात असल्याचा समोर आलं आहे. गुन्हे शाखे तर्फे दहिसरच्या गिरी निवास रावळपाडा दहिसर पूर्व मधून तीन मुलींची सुटका करण्यात आली असून संजय गोविंदास नावाच्या एका दलालाला अटक करण्यात आलीय.
तो या सर्व प्रकाराचा सूत्रधार होता. ह्या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळाली होती की दहिसरच्या रावळपाडा मध्ये मानवी तस्करीचं रॅकेट आहे. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाड टाकली तेव्हा त्यांना तिथे तीन मुली आढळून आल्यात. त्यात एक तरुणी ही पश्चिम बंगालची असल्याचं आढळून आलंय.
तर दुसरी मुलगी ही बांगला देशाची नागरीक असल्याचं निष्पन्न झालं. तिच्याकडे बांगलादेशचा पासपोर्ट आणि व्हिसा मिळून आलाय. ह्या सर्व मुलीकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचं सष्ट झालंय.
हा सर्व प्रकार परदेशी मुलींची तस्करी आणि वेश्या व्यवसायाशी निगडित असल्याने नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई सुरू आहे आरोपी दलालाला अटक करून ह्या रॅकेट मध्ये इतर कोण कोण आहे ह्याचा शोध सध्या गुन्हे शाखे मार्फत सुरू आहे.
रिपोर्टर