थर्टीफर्स्टला शेवटची लोकल पहाटेपर्यंत! असे असणार मध्य, पश्चिम आणि हार्बरचे स्पेशल वेळापत्रक

बिनधास्त करा थर्टीफर्स्ट साजरा! मध्य, पश्चिम आणि हार्बरवर धावणार स्पेशल ट्रेन


मुंबई.(प्रतिनिधी): नवीन वर्षात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान दिनांक 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर प्रवाशांच्या सुविधेकरीता 4 उपनगरीय विशेष गाड्या चालविण्यात येतील. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. याचबरोबर पश्चिम रेल्वेच्या वतीनं चर्चगेट ते विरार अशा चार विशेष चार लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.  नवीन वर्षात प्रवाशांना घरी परतण्यासाठी शेवटची लोकलही पहाटे 3.25पर्यंत चालवण्यात येणार आहे. खालील प्रमाणे असणार स्पेश वेळापत्रक                         

मध्य रेल्वे विशेष गाड्या

कल्याण विशेष - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1.30 वाजता प्रस्थान करून कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष-कल्याण येथून 1.30 वाजता प्रस्थान करून 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल                            हार्बर लाइन विशेष गाड्या

पनवेल विशेष - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1.30 वाजता प्रस्थान करून 2.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष – पनवेल येथून 1.30 वाजता प्रस्थान करून 2.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

पश्चिम रेल्वे विशेष गाड्या


विरार विशेष- चर्चगेट येथून 1.15, 2, 2.30 आणि 3.25 वाजता विरार स्थानकापर्यंत लोकल उपलब्ध असतील. विरारला शेवटची लोकल 5.05 वाजता पोहचेल.

चर्चगेट विशेष- विरार येथून 12.12, 12.45, 1.40 आणि 3.05 वाजता चर्चगेट स्थानकापर्यंत लोकल उपलब्ध असतील.



रिपोर्टर

संबंधित पोस्ट