पश्चिम रेल्वेवर अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीला मंजुरी

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल दाखल होताच सामान्य लोकलच्या दररोजच्या बारा फेऱ्यांवर गदा आली.

मुंबई : पश्चिम रेल्वेवर सहा डबे वातानुकूलित व सहा डबे साधारण अशा बारा डब्यांच्या उपनगरी रेल्वेच्या चाचणीला रेल्वेच्या रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेनने (आरडीएसओ) मंजुरी दिली आहे. त्याची चाचणी पुढील आठवडय़ापासून करण्याचा विचार केला जात आहे.

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकल दाखल होताच सामान्य लोकलच्या दररोजच्या बारा फेऱ्यांवर गदा आली. त्यामुळे सामान्य लोकलच्या प्रवाशांचा रोष पत्करावा लागला. तसेच वातानुकूलित लोकलला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अर्धवातानुकूलित लोकल चालवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून चाचपणीही केली जात होती.

अखेर पश्चिम रेल्वेने बारा डब्यांपैकी सहा डबे वातानुकूलित असलेल्या अर्धवातानुकूलित लोकल चाचणीचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. या लोकलच्या चाचण्या पुढील आठवडय़ापासून सुरू करण्याचा विचार करीत आहोत. परंतु त्याआधी बारा डब्यांपैकी तीन डबेच वातानुकूलित केल्या जाणाऱ्या दुसऱ्या चाचणीचा प्रस्तावही असून त्याची मंजुरीही घेण्याचा प्रयत्न आहे. त्याला मंजुरी मिळाली तर सहा डबे वातानुकूलित व सहा डबे साधारण असलेल्या बारा डब्यांची लोकलची चाचणी घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट केले. सध्या पश्चिम रेल्वेवर चार वातानुकूलित लोकल असून यातील दोन लोकल सेवेत आहेत. उर्वरित लोकलपैकी एका वातानुकूलित लोकलचे काही डबे काढून ते सामान्य लोकल गाडीला जोडून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहे.

बारा डब्यांमधील जास्त डबे वातानुकूलित जोडले तर त्यालाही कमी प्रतिसाद मिळण्याची भीती रेल्वेला आहे. त्यामुळे कमी डबे वातानुकूलित ठेवून अर्धवातानुकूलित लोकल चालवण्यावरच अधिक भर असल्याचेही सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेने नऊ डबे विनावातानुकूलित आणि सहा डबे वातानुकूलित असलेल्या पंधरा डबा अर्धवातानुकूलित लोकलच्या चाचणीचाही प्रस्ताव तयार करून तो आरडीएसओकडे पाठवला आ

रिपोर्टर

संबंधित पोस्ट