पवारांची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी- मुख्यमंत्री

आधे इधर जावो आधे उधर जावो बाकी मेरे पिछे आवो, पवारांची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी- मुख्यमंत्री

मुंबई- शरद पवारांचे बहुतेक सरदार युतीमध्ये दाखल झाले असल्यामुळे पवारांची अवस्था शोले मधल्या जेलर सारखी झाली आहे.  'आधे इधर जावो आधे उधर जावो बाकी मेरे पिछे आवो' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पवारांची खिल्ली उडवली आहे.
सध्या मुख्यमंत्र्यांच्या प्रचार संभाचा धडका सुरू आहे आणि प्रचारात ते विरोधकांवर सडकून टीका करीत आहेत. नागपूरच्या सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले पवारांनी नागपूरला गुंडांचे शहर असे म्हटले आहे. मग नागपूर गुंडांचे आहे की चांगल्या लोकांचे हेच त्यांना दाखवून द्यायचे आहे. हा नागपूरकर एकटा त्यांना भारी पडला आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. विधानसभेच्या रणांगणात आमचे पहिलवान कुस्ती जिंकायला तयार आहेत पण कोणाशी लढायचे तेच कळत नाही. कारण समोर चांगला पाहिलवनाच नाही. या निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची अजिबात शक्यता वाटत नव्हती म्हणून राहुल गांधींनी प्रचाराकडे पाठ फिरवली. आता पवार एकटे फिरात आहेत पण त्यांचे अर्धे शिलेदार शिवसेनेत गेले तर अर्धे भाजपकडे आले आहेत. उरलेले थोडे उसने अवसान आणून पवारांसोबत आहेत. पण त्यांनाही ठाऊक आहे की आपला पराभव अटळ आहे. काँग्रेस सरकारने गेल्या ७० वर्षात जे केले नाही ते आमच्या सरकारने ५ वर्षात करून दाखवले. आम्ही शेतकऱ्यांना काँग्रेसपेक्षा अधिक कर्ज माफी दिली आणि शेवटचा कर्जबाजारी शेतकरी जोवर कर्जमुक्त होत नाही तोवर कर्जमाफी योजना चालूच ठेवणार आहे. बेकारानां  रोजगार, बेघरांना घर आणि शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक त्या साधन सुविधा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आघाडीच्या काळात राज्य पाचव्या क्रमांकावर होते. आज पहिल्या क्रमांकावर आहे. हेच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. म्हणूनच युतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट