स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचे संचलन

मुंबई -केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याने पाकिस्तानी दहशतवादी सूड घेण्यासाठी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी देशात आणि खास करून मुंबईत घातपाती घटना घडवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि मुंबई शहर पोलीस पूर्णपणे सतर्क असून काल दादर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस यांनी संयुक्तपणे संचालन केले.
दादर रेल्वे स्थानकाबाहेर करण्यात आलेल्या या संयुक्त संचालनात दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे तीन अधीकारी ४६ पोलीस कर्मचारी,४ होमगार्ड,घटकबोपर मुख्यालयातील ३० पोलीस कर्मचारी,तसेच आरसिपी चे २ अधिकारी व २६५ कर्मचारी हजर होते त्याच बरोबर माटुंगा शहर पोलीस ठाण्याचे ३ अधिकारी २५ पोलीस कर्मचारी,भोईवड पोलीस ठाण्याच्या १ अधिकारी ९ कर्मचारी,दादर आरपीएफ चे ३ अधिकारी ३० कर्मचारी असे एकूण ११ अधिकारी व १४० कर्मचाऱ्यांनी या संचलनात भाग घेतला या संयुक्त संचालनाची सांगता दादरच्या मेन गेट येथे राष्ट्रगीताने झाली. प्रवासींनीही या संचालनाची कौतुक केले. दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.



रिपोर्टर

संबंधित पोस्ट