प्रकल्प बाधितांची घरे लाटून चिटर यशवंत गंगावणे बनला गोल्डनं मॅन; पालिकेची बनावट कागदपत्रे आणि सहा.आयुक्तांच्या बनावट सह्यांची बोगस अलॉटमेंट लेटर

*अंधेरीच्या एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गंगावणे कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल; पण ६ वर्ष उलटली तरी कारवाई नाही
*प्रकल्प बाधितांकडून उच्च न्यायालयात दावा दाखल
*अंगावर दोनतीन किलोचे दागिने घालून आलिशान गाडीतून फिरणाऱ्या गंगावणेकडे इतका पैसा आला कुठून ?
*ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी करण्याची प्रकल्प बाधितांची मागणी


मुंबई (प्रतिनिधी) पालिकेची बनावट कागदपत्रे बनवून पालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून प्रकल्प बाधितांच्या खोल्या लाटून गोल्डन मॅन बनलेल्या नायगाव मधील यशवंत गंगावणे या भामट्याविरुद्ध अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही अजून त्याला का अटक झाली नाही. आणि त्याच्या विरुद्ध २०१२ साली गुन्हा होऊनही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल पालिका ६ वर्ष गप्प का? फिर्यादी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांबरोबर गंगावणेने काही सेटिंग तर केली नाही ना ? आणि तसे असेल तर गंगावणे बरोबरच फिर्यादी असलेल्या 'बी' विभागाच्या  तत्कालीन अधिकाऱ्यांचेही चौकशी करावी अशी मागणी या प्रकरणी न्यायालयात गेलेल्या प्रकल्प बाधितांनी केली आहे. इतकेच नव्हे तर कधी काळी भिकाऱ्या सारखी अवस्था असलेला यशवंत गंगावणे सध्या अंगावर दोन चार किलोचे सोन्याचे दागिने घालून मिरवतोय. त्याच्या बायकोच्याही अंगावर तसेच दागिने आहेत. इंपोर्टेड गाडीत फिरणे, ऐषोआरामात जगणे हा सगळा पैसा त्याच्याकडे कुठून आणि कसा आला. त्यासाठी त्याने कोणकोणते झोलझपाटे केले याची चौकशी आयकर विभाग आणि ईडी ने करावी अशी मागणीही प्रकल्प बाधितांनी केली आहे. यशवंत गंगावणे हा भारिप बहुजन महासंघाच्या म्युनिसिपल युनियनचा पदाधिकारी असल्याचे सांगितलेले जाते. पण गरिबांच्या माना मोडून गोल्डन मॅन बनलेल्या या बदनाम यशवंत गंगावणे मुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघ आणि वंचित आघाडीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीपूर्वीच या चिटर गोल्डन मॅन ची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी नायगावची स्थानिक जनता करीत आहे. 
२००६ मध्ये मस्जिद बंदर येथील एका पुलाचे रुंदीकरण करण्यासाठी तिथल्या १२३ झोपड्या तोडण्यात आल्या त्यात ६१ पात्र तर ६२ अपात्र होत्या. सरकारच्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या नियमानुसार जेथे एस.आर.ए प्रकल्प सुरू असेल तेथील नव्या सदनिकांमध्ये १० टक्के कोटा हा पालिकेचा असतो आणि तिथे या प्रकल्प बाधितांची पुनर्वसन केले जाते. त्या नुसार मस्जिद बंदराच्या प्रकल्पग्रस्तांचे अंधेरीच्या मरोळ मरोशी येथील बस डेपोच्या मागे बांधलेल्या इमारतीमध्ये पुनर्वसन केले जाणार होते त्यानुसार पालिकेच्या बी विभागातील अधिकाऱ्यांनी आकृती बिल्डर्स बरोबर पत्रव्यवहार करून मस्जिद बंदराच्या पात्र झोपडपट्टीवासीयांना मरोळच्या आकृती सिटी बिल्डरने एस.आर.ए अंतर्गत बांधलेल्या अरुणोदय कॉ.ऑप. सोसायटीत शिफ्ट केले जाणार होते पण यशवंत गंगावणे याने पालिकेच्या बी विभागाचे सहा.आयुक्त करवंदे यांच्या बोगस सह्या, शिक्क्यांसह बनावट लेटर बनवून इमारत क्रमांक २ व ३ मधील ५ खोल्यांचा जबरदस्तीने ताबा घेतला. यातील इमारत क्रमांक ३ मधील ६०७ क्रमांकाची खोली प्रभाकर बाबू गंगावणे ६१२ क्रमांकाची खोली यशवंत दत्ता गंगावणे (स्वतः) साठी ७०२ क्रमांकाची खाली प्रिया यशवंत गंगावणे (पत्नी) ७०४ क्रमांकाची खोली अनिल आबाजी मोरे (मेव्हणा) आणि ७०५ क्रमांकाची खोली बबन दत्ता गंगावणे (भाऊ) अशा ५ खोल्या पालिकेची बोगस कागदपत्र बनवुन हडप केल्या. मात्र याबाबत पालिकेने जेंव्हा चौकशी केली तेंव्हा गंगावणेची सगळी चिटिंग उघडकीस आली. कारण या पाच रुम साबा लालू मंसूर ,कम्मू किशन वाघेला,पुजारी रामचंद्र प्रकाश यांच्या नावे अलॉट झाल्या होत्या तर दोन खोल्या 'बी' वॉर्ड मध्ये नसल्याने त्या मालमत्ता विभागाकडे आहेत. ज्या प्रकल्प बाधितांची घरे होती त्यांनी अलॉटमेंट लेटर घेतलेच नसल्याने त्याच्या चाव्या आणि ताबा पालिकेच्या मालमत्ता विभागाकडे असल्याने पालिकेने याबाबत सुरवातीला आकृती सिटी बिल्डरकडे पत्रव्यवहार करून जाब विचारला. पण त्याच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने १२/७/२०१२ रोजी एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात पालिकेने फिर्याद नोंदवताच पोलिसांनी यशवंत गंगावणे,प्रभाकर गंगावणे,बबन गंगावणे,प्रिया गंगावणे आणि आबाजी मोरे यांच्या विरुद्ध  भा द वी कलम  ४६५ ,४६७ ,४६८ ,४७१ ,४७६ ,४२० ,४५४ ,४५७ ,४४८  आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यशवंत गंगावणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर अजून कारवाई झाली नाही किंवा पालिकेकडून कारवाईबाबत पाठपुरावाही झालेला नाही. त्यामुळे गंगावणे बिनधास्त अंगावर सोन्याचे दागिने घालून गोल्डन मॅन बनून फिरतोय. त्यामुळे एवढा पैसा त्याने कुठून आणला त्याची आता ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करावी अशी मागणी प्रकल्पबाधितांनी केली आहे. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यशवंत गंगावणेच्या पाठीशी
कोणत्याही समाजकंटकाला एकतर राजकीय नेत्याचे आशीर्वाद असतात किंवा पोलिसांचा त्याला पाठींबा असतो म्हणून ते बिनधास्त कोणतेही  बेकायदेशीर कृत्य करतात. नायगावचा गोल्डन मॅन यशवंत गंगावणे यालाही शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास बी गंगावणे यांचा आशीर्वाद असल्याने आपले कुणीही काही करू शकत नाही अशा अविर्भावात यशवंत गंगावणे बिनधास्त झोलझपाटे करीत असतो. विलास गंगावणे यापूर्वी डोंगरी, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत होते तेंव्हापासून यशवंत गंगावणे त्यांच्या संपर्कात आहे.



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट