नागरिकांच्या सुरक्षेसाठी २९ धोकादायक पुलांचे निष्कासन व पुनर्बांधणी; पादचारी पुलांसह वाहतूक पुलांचाही २९ पुलांमध्ये समावेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारित आहेत ३४४ पूल

बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित ३४४ पूल आहेत. यापैकी नवीन व दोषदायित्व कालावधी अंतर्गत असलेले पूल वगळता ३०४ पुलांची संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) प्रगतीपथावर आहे. या परीक्षणानुसार आतापर्यंत २९ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे.यामध्ये पादचारी पुलांसह (FOB) वाहतूक पुलांचाही समावेश आहे. संरचनात्मक परीक्षणातील निष्कर्ष लक्षात घेता मुंबईकरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महापालिकेने या पुलांचे निष्कासन व पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. तथापि, निष्कासन व पुनर्बांधणी दरम्यान मुंबईकरांना कमीतकमी त्रास व्हावा, याचेही नियोजन महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. हे पूल तोडल्यामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याची नम्र जाणीव महापालिकेला आहे. परंतु मुंबईकरांची सुरक्षितता ही सर्वेाच्च बाब असल्याने ही कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. त्यामुळेच या पुलांचे निष्कासन व पुनर्बांधणीचे काम महापालिकेच्या पूल खात्यांद्वारे रात्रंदिवस पद्धतीने करण्यात येत आहे. जेणेकरुन या पुलांच्या पुनर्बांधणीचे काम लवकरात लवकर होऊन वाहतूक सुरळीत होऊ शकेल, अशी माहिती पूल खात्याचे प्रमुख अभियंता श्री. संजय दराडे यांनी दिली आहे.तरी मुंबईकरांना या कार्यवाहीस सहकार्य करावे, अशी नम्र विनंती पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित ३४४ पूल असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या पुलांचे संरचनात्मक परीक्षण (Structural Audit) नियमितपणे करण्यात येते. यानुसार ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१८ या कालावधी दरम्यान २९६ पुलांचे संरचनात्मक परिक्षण करण्यात आले. हे परीक्षण करताना नुकतेच बांधलेले किंवा हस्तांतरित झालेले आणि दोषदायित्व कालावधी (DLP) यात असलेले ४८ पूल वगळता उर्वरित २९६ पुलांचे परीक्षण करण्यात आले होते. या परीक्षणाअंती १४ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले होते.


दि. १४ मार्च २०१९ रोजी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या अखत्यारितील ३०४ पुलांचे संरचनात्मक परीक्षण पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पूर्व उपनगरे भागातील ६६; तर पश्चिम उपनगरे भागातील १५७; यानुसार आतापर्यंत २२३ पुलांचे संरचनात्मक परिक्षण पुन्हा करण्यात आले असून यात १५ पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त झालेला पूल हा शहर भागातील असल्याने शहर भागासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित संरचनात्मक परीक्षण करणा-या संरचनात्‍मक परिक्षकास काळ्या यादीत टाकण्यात आले. परिणामी, शहर भागासाठी नवीन संरचनात्‍मक परिक्षक नेमण्याची निविदा प्रक्रिया करण्यात येऊन शहर भागातील ८१ पुलांच्या संरचनात्मक परीक्षणसाठी नवीन संरचनात्‍मक परिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.


ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०१८ दरम्यान पहिल्या परिक्षणादरम्यान धोकादायक असल्याचे आढळून आलेले १४ पूल व दुस-या परिक्षणादरम्यान धोकादायक असल्याचे आढळून आलेले पूर्व व पश्चिम उपनगरातील १५ पूल; यानुसार एकूण २९ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या २९ पुलांपैकी आतापर्यंत ८ पूल निष्कासित करण्यात आले असून १२ पुलांचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. लवकरच त्यांचे निष्कासन करण्यात येणार आहे. तर उर्वरित ९ पूल शिघ्रतेने बंद करुन निष्कासन करण्यात येईल.


सदर २९ पुलांपैकी ३ पुलांचे पुनर्बांधणीचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तर ७ पुलांबाबत मा. स्थायी समितीकडे 'डीएल' सादर करण्यात आले आहे. तर ५ पुलांबाबत निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित प्रकरणी प्रस्ताव प्रगतीपथावर आहे.


मुंबई शहर भागातील ८१ पुलांचेही संरचनात्‍मक परिक्षण करण्यात येणार आहे. याअंतर्गत 'परिमंडळ - ' (विभाग: , बी, सी, डी, ) करिता तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन नवीन संरचनात्‍मक प‍रीक्षक मे. स्‍ट्रक्‍टवेल डिझाईन्‍स आणि कन्‍सल्‍टंट प्रा.लि. यांची नेमणूक करुन ३६ पुलांचे परिक्षण करण्याचे कार्यादेश देण्‍यात आले आहेत. तर शहर भागातील 'परिमंडळ – २' करिता (विभाग: जी दक्षिण, जी उत्तर, एफ दक्षिण, एफ उत्तर) ४५ पुलांचे संरचनात्‍मक लेखाप‍रीक्षक मे. स्‍ट्रक्‍टवेल डिझाईन्‍स आणि कन्‍सल्‍टंट प्रा.लि. यांची नेमणूक करण्‍यासाठी यथायोग्य निविदा मसुदा स्‍थायी समितीस सादर केला आहे व स्‍थायी समितीची मंजूरी प्राप्‍त होताच कार्यादेश देण्‍याची प्रक्रिया प्राधान्याने करण्‍यात येणार आहे.

===


बातमीच्या अनुषंगाने पूरक माहिती

२९ धोकादायक पुलांबाबत संक्षिप्त तपशिल पुढीलप्रमाणे आहे:

क्र.

विभाग

पूल (संक्षिप्त तपशिल)

पुलाचा प्रकार

सद्यस्थिती / संबंधित तपशिल

1

बी

यल्‍लो गेट पूल

पादचारी

निष्कासित

2

सी

महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (दक्षिण)

पादचारी

निष्कासित

3

सी

महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (उत्‍तर )

पादचारी

निष्कासित

4

एच पूर्व

वाकोला नाल्‍यावरील हंस भुग्रा मार्गावरील पूल

वाहतूक पूल

एम.एम.आर.डी.. द्वारे

कार्यवाही

5

एच पूर्व

हंस भुग्रा मार्ग, पाईपलाईन सर्विस रोड पूल

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

6

एच पश्चिम

जुहू तारा रोड पूल

वाहतूक पूल

सध्या वाहतुकीसाठी वापरात. सीआरझेड कडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर या काम ऑक्टोबर २०१९ नंतर हाती घेण्यात येईल

7

के पूर्व

धोबी घाट, मज्‍जास नाला पूल

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

8

के पूर्व

मेघवाडी नाला, श्‍यामनगर

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

9

एच पूर्व

बांद्रा धारावी रोड पूल

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.
सीआरझेड कडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सदर पुलाचे काम ऑक्टोबर २०१९ नंतर हाती घेण्यात येईल

10

आर दक्षिण

बिहारी टेकडी ब्रीज,

वाहतूक पूल

निष्कासित व बांधकाम कार्यवाही सुरु

11

पी दक्षिण

वालभट्ट नाला येथील पूल, वालभट्ट रोड, गोरेगांव (पूर्व)

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

12

आर दक्षिण

विठ्ठल मंदिर, ईरानी वाडी येथील पूल, रगडा पाडा

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

13

आर दक्षिण

एस.व्‍ही.पी रोड, कृष्‍ण कुंज बिल्डिंग जवळील पूल

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

14

आर दक्षिण

आकुर्ली रोड येथील पूल, हनुमान नगरे, धर्मराज डेरी जवळ,

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

15

पी उत्तर

प्रेम नगर नाला, एस.व्‍ही. रोड, बाटा शोरुम, मालाड

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

16

पी उत्तर

गांधी नगर, कुरार व्‍हीलेज पूल

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

17

पी दक्षिण

ओशीवरा नाला, एस.व्‍ही. रोड

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

18

पी दक्षिण

पिरामल नाला, लिंक रोड

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

19

पी उत्तर

चंदावाडकर नाला १२० फूट लिंक रोड, मालाड

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

20

आर मध्य

फक्‍टरी लेन, बोरिवली

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

21

आर उत्तर

एस.बी.आय कॉलनी, वैभव को.हौ.सो.लि.

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

22

आर दक्षिण

रतन नगर पासून दौलत नगर पूल

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

23

एल

खैरानी रोड वरील हरी मज्‍जीद नाल्‍यावरी पूल

वाहतूक पूल

निष्कासित

24

टी

रमाबाई पाडा गुरुनानक नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड () येथील वीर संभाजी नगर पूल

पादचारी पूल

निष्कासित

25

एन

संत मुक्‍ताबाई हॉस्‍पीटल जवळील बर्वे नगर येथील पूल

पादचारी पूल

निष्कासित

26

एन

पॅन्‍थर नगर जवळील, मातृछाया बिल्‍डींग नं. ४२, कन्‍नमवार नगरे, विक्रोळी (पूर्व) येथील पूल

वाहतूक पूल

लवकरच बंद करणार.

27

एस

रेनीसन्‍स हॉटेल जवळील पूल, पवई

पादचारी पूल

निष्कासित

28

एन

लक्ष्‍मी बाग कल्‍वर्ट

वाहतूक पूल

वापरासाठी बंद

29

एन

निलकंठ नाल्‍यावरील पूल, घाटकोपर

वाहतूक पूल

वापरासाठी बंद.

***

संबंधित पोस्ट