आदित्य पांचोली करायचा कंगना राणावतला मारहाण आणि बलात्कार - कंगनाची बहीण रंगोलीने केले आरोप

 कंगना जेव्हा बॉलीवूडमध्ये नवीन आली होती, तेव्हा  कंगना-आदित्यचे अफेअर होते आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. त्यावेळी ५४ वर्षीय आदित्यने तिला मारहाण करत तिचे लैंगिक शोषण केले होते.  अशी तक्रार कंगना राणावतची बहीण रंगोलीने अभिनेता आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप लावत पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. मुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये रंगोलीने ई-मेलवरून पांचोलीवर मारहाण आणि लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. तक्रारीत हेदेखील म्हटले की, आदित्यची पत्नी जरीना वहाबलादेखील या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. प्रकरण १३ वर्षे जूने आहे.

मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे- आदित्य
आदित्य पांचोलीने आपला बचाव करताना म्हटले की, माझ्यावर खोटे आरोप लावण्यात येत आहेत. मिड-डेला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला  की- 'मी कंगनावर मानहाणीची तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीला परत घेण्यासाठी कंगनाच्या वकीलाने मला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली आणि माझ्याविरूद्ध खोटी तक्रार दाखल केली. माझ्यावर लावलेल्या आरोपांना काहीच तथ्य नाहीये.' पुढे अदित्यने सांगितले की- 'जेव्हा मी कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा कंगनाच्या वकीलाने मला धमकी दिली आणि याची मी १८ मिनींटाची रेकॉर्डिंगदेखील केली आहे. ही रेॉकॉर्डिंग मी पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. २५ एप्रिलला वर्सोवा पोलिस माझ्या घरी नोटीस घेऊन आली, तेव्हा मी चकित झालो. मी त्याचवेळी त्यांना रेकॉर्डिंग दिली आणि १२ तारखेला माझा जबाब नोंदवला. तर पोलिसांचे म्हणणे आहे की, सध्या दोन्ही पक्षांची बाजू ऐकण्यात आली आहे आणि याआधारे पुढील तपास केला जाईल.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट