सेनेचा युतीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम; भाजपचे पीएम होणार असतील तर राज्यात शिवसेनेचा सीएम!
- by Adarsh Maharashtra
- Feb 15, 2019
- 1398 views
मुंबई- स्वबळावरच लढणार, असा पवित्रा घेऊन भाजपला सतत ठोकून काढणारे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी वेगळा पवित्रा घेत भाजपला पंतप्रधान हवा असेल तर राज्यात मुख्यमंत्रिपद सेनेकडे हवे, असे म्हटले आहे. शिवसेनेने युतीसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला असल्याचे म्हटले असले तरी भाजपने मात्र असा कोणताही अल्टिमेटम आला नसल्याचे स्पष्ट केले. युतीबाबत प्रथमच सकारात्मक भूमिका मांडत संजय राऊत यांनी म्हटले की, युतीची चर्चा देवाणघेवाणीतून होत असते. ‘माझे ते माझे आणि तुमचे तेही माझ्या बापाचे’ अशा भूमिकेतून युतीची चर्चा होत नाही. भाजपला जर केंद्रात सरकार स्थापन करायचे असेल, मोदी यांना पंतप्रधान व्हायचे असेल तर आम्ही तयार आहोत. मात्र, राज्यात आमचाच मुख्यमंत्री असेल. २०१४ मध्ये जागा वाढल्या म्हणून कुणी मोठा भाऊ होत नाही. केंद्रात भाजप मोठा भाऊ आणि राज्यात आम्हीच मोठे भाऊ आहोत, असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप-शिवसेना युतीबाबत दोघांत चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही चर्चा सकारात्मक झाली असून शेतकरी व कामगारांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेचे काही मुद्दे आहेत. ते प्रश्न सोडवण्यासही सरकार सकारात्मक आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम