शरद पवारांविरोधात लोकसभेला उमेदवार देणार : प्रकाश आंबेडकर
- by Adarsh Maharashtra
- Feb 11, 2019
- 903 views
मुंबई- वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात उमेदवार देऊ, असा इशारा भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. पवार यांच्या माढयातून पुन्हा लोकसभा लढवण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. तर, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातल्या लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याच्या वक्तव्य केले. मात्र, त्यांनी किमान ४० जागांची मतमोजणी व्हीव्हीपॅटने करावी, असे आव्हानही आंबेडकर यांनी दिले आहे.
ते मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मुंबईतल्या शिवाजी पार्कवर २३ फेब्रुवारी रोजी ओबीसी परिषद आयोजित केली आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित होतील. काँग्रेसला संघाशी लढायचे नसल्यास आम्ही आमच्या स्वतंत्र वाटेने जायला मोकळे आहोत. आमच्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व आघाडी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आघाडी होऊ शकते, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसंदर्भातली चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर अडली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार, ते काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. त्याशिवाय काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, याचा पुनरुच्चारही आंबेडकर यांनी केला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम