वर्सेावा परिसरात १२५ अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई; मुंबई पोलीस व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने 'के पश्चिम' विभागाची कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Feb 07, 2019
- 1388 views
बृहन्मुंबई महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागात वर्सेावा परिसरातील कवठे-खाडीवर वर्सेावा ते लोखंडवाला या परिसरांना जोडणारा पूल (यारी रोड पूल) महापालिकेद्वारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. या पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली असली, तरी पूल रेषेत (Bridge Line) दोन्ही बाजूला असणा-या सुमारे १२५ अतिक्रमणांमुळे या पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु होण्यास अडथळे येत होते. यापैकी ५५ अतिक्रमणे ही पुलाच्या एका बाजूला असणा-या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारितील जमिनीवर उद्भवली होती, तर पुलाच्या दुस-या बाजूला असणा-या वन खात्याच्या जमिनीवर ७० अतिक्रमणे उद्भवली होती. परिमंडळ – ४ चे उपायुक्त श्री. किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागाद्वारे दोन टप्प्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान सर्व १२५ अतिक्रमणे तोडण्यात आली आहेत. मुंबई पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता कवठे खाडीवरील सुमारे ३४५ लांबीच्या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती 'के / पश्चिम' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
वर्सेावा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल नगरजवळील सिद्धार्थ नगर परिसराजवळ असणारी ५५ अतिक्रमणे आणि कवठे खाडीजवळील वन विभागाच्या जमिनीवर व 'फिशरीज इन्स्टिट्यूट' जवळ असणारी ७० अतिक्रमणे; अशी एकूण १२५ अतिक्रमणे प्रस्तावित यारी रोड पुलाच्या रेषेत होती. ज्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन देखील नागरिकांना उपयोगी ठरणा-या या पुलाचे बांधकाम सुरु झाले नव्हते. तथापि, याबाबत महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागाद्वारे दोन टप्प्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईअंती सर्व १२५ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. काल संध्याकाळी उशीरापर्यंत सुरु असलेल्या दुस-या टप्प्यातील कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे ४० पोलीस कर्मचारी, महापालिकेचे ४० कामगार – कर्मचारी - अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे ६ कर्मचारी / अधिकारी सदर ठिकाणी कर्तव्यावर उपस्थित होते. तसेच या ही कारवाईसाठी २ जेसीबी, २ डंपर वापरण्यात आले, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त श्री. गायकवाड यांनी दिली आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम