उत्तर प्रदेशमध्ये ‘बुआ- भतीजा’ एकत्र; भाजप ला देणार टक्कर
- by Adarsh Maharashtra
- Jan 12, 2019
- 470 views
आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार असून भाजपाविरोधात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. शनिवारी लखनौत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी बसपा- सपा आघाडीची घोषणा केली. भाजपाच्या हुकमी कारभाराविरोधात आम्ही एकत्र आले असून जनतेला आमच्याकडून आशा आहेत, असे त्यांनी सांगितले म्हटले आहे.
लखनौतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अखिलेश यादव आणि मायावती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस व भाजपावर निशाणा साधला. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती ,काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार, गरिबी वाढली, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस- भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा त्यांनी केला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम