महाराष्ट्र सरकारची घोडचूक! २०१९ च्या सरकारी कॅलेंडरमधून महापुरुषांच्या पुण्यतिथी गायब
- by Adarsh Maharashtra
- Jan 06, 2019
- 903 views
मुंबई - महाराष्ट्र सरकारकडून झालेली एक मोठी चूक उघडकीस आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथींचा सन २०१९ च्या कॅलेंडरमध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही. मंत्रालयाचे सर्व विभाग आणि राज्यभरातील सर्व सरकारी कार्यालयांना तसेच संघटनांना वितरित करण्यात आलेल्या कॅलेंडरमध्ये महात्मा फुले (२८ नोव्हेंबर) आणि बाबासाहेब आंबेडकर (६ डिसेंबर) यांच्यासहित इतर महापुरुषांच्या पुण्यतिथींचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर) आणि जागतिक दिव्यांग दिन (३ डिसेंबर) यासारख्या तिथींचा उल्लेख आहे, परंतु या भारताचे शिल्पकार असलेल्या महापुरुषांची पुण्यतिथी कॅलेंडरमध्ये नसल्याने विरोधी पक्षांनी चांगलच धारेवर धरण्याची तयारी सुरू केली आहे.
विधानसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याला अत्यंत गंभीर चूक म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच यासाठी जबाबदार कोण, हे जाणून घेण्याची मागणी केली आहे. विखे-पाटील म्हणाले, "हे (भाजप-शिवसेना) सरकार फक्त राजकीय फायद्यासाठीच या महापुरुषांच्या नावाचा वापर करते, परंतु वार्षिक दिनदर्शिकेत त्यांची नावे विसरून जाते."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, ही चूक दोन महापुरुष फुले आणि आंबेडकरांच्या कार्याचा अपमान आहे. त्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून माफीची मागणी केली. मुंडे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे की, या महापुरुषांची नावे आणि चित्र कॅलेंडरमधून कसे हटवण्यात आले, यासाठी जबाबदार कोण आहे, आणि त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली जाणार आहे?"

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम