अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणा नाही मंदिरातील प्रवेश संस्कृतीनुरुपच व्हावा-शिरवडकर

मुंबई(प्रतिनिधी) - शिर्डि साई संस्थेंनी भक्तांकरता ड्रेस कोडचे आवाहन केल्यानंतर काही प्रसिद्धी लोलूपांनी आकांडतांडव करण्यास सुरुवात केली याला काय म्हणावे?आपल्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे,संस्कृती-परंपरा जपणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे,असे असताना अभिव्यक्ती  स्वातंत्र्याचा सोयीनुसार वापर करणे योग्य नाही असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैरपणे वागणे नाही. उद्या अभिव्यक्तीच्या नावाखाली डंका पिटणारे जर म्हणू लागले की चपला घालून आम्ही मंदिरात जाऊ,नशापान करून जाऊ,चामड्याच्या वस्तू घेऊन मंदिरात जाऊ,मांस-मच्छी घेऊन जाऊ तर ते चालेल काय?हिंदू संस्कृतीने व पूर्वजानी पूर्वापार काही नितीनियम,मूल्ये,संस्कृती, परंपरा जपल्या आहेत. देवळात भक्त श्रध्देने जातो,तो काही पिकनिक करायला जात नाही. त्यामुळे शिर्डी संस्थानने केलेले आवाहन यथायोग्य आहे. केवळ शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरातच नाही तर राज्यातील व देशातील सर्वच मंदिरांमध्ये ड्रेसकोड असायलाच हवा व प्रत्येक हिंदूने कोणतीही तक्रार न करता त्याचे पालन करून विनाकारण प्रसिद्धी मिळविण्याकरता आंदोलने करण्याऱ्यांना कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यां अतृप्तांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणणारे जर भारतीय हिंदू संस्कृती-परंपरा-नीतीमुल्ये यांच्या आड येऊ पहात असतील तर त्यांचा देवस्थानाबरोबरच  प्रत्येक हिंदूने निषेध केला पाहिजे असे मत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

संबंधित पोस्ट