खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट आणि त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पोलीस धाऊन गेले !

मुंबई ( जीवन तांबे )  खाकी वर्दीतही माणुसकीचा झरा असतो, हे कोरोना महामारीत चेंबूर टिळक नगर ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळील पुलाखाली एक अनोळखी आजारी वृद्धास टिळक नगर पोलिसांनी रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन दाखविले.

खाकी वर्दीतही माणूसकीचा झरा असतो. हे कोरोना महामारीत पोलिस मंडळीनी दाखवून दिले आहे. या पोलिसांना वेळेवर कधी कधी कठोर भूमिका ही घ्यावी लागते. मात्र त्यात ही जनतेचे हीत असते. हे विसरून चालणार नाही. कठोर भूमिका घेत असताना देखील जनसामान्य आणि भुकेलेल्याचा आधार बनण्यात महाराष्ट्र पोलीस कायम अग्रेसर आहे. असाच पोलिसांमधील

माणुसकीचा झरा टिळक नगर पोलिसांनी दाखवून दिला आहे. 

टिळक नगर रेल्वे स्थानक जवळील पुलाखाली एक अनोळखी वृद्ध कित्येक दिवसापासून आजारी असल्याने एका जागेवर पडून होता. तो आपल्या सर्व प्रात विधी जागेवरच करीत असल्याने त्यांच्या अंगाचा कुजलेला वास येत होता. तो खात पीत नव्हता त्यामुळे पूर्ण पणे खंगला होता. त्याला काही नागरिक खायला आणून देत होते परंतु त्याला दिलेला खाऊ ती तसाच ठेवून द्यायचा. याबाबत एक जागरूक नागरिक इम्युनल राजन नाडर यांनी पोलीस आयुक्तांना ट्विट केले. त्यांनी त्वरित दखल घेऊन टिळक नगर ठाण्याला संपर्क करून घटना स्थळी जाण्यास सांगितले.

तत्काळ  पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू यादव, पोलीस नाईक बबन गावित, पोलीस शिपाई नामदेव कारंडे यांनी पुलाखाली त्या अनोळखी वृद्ध व्यक्तीचा शोध घेतला त्याच्या जवळ गेले असता कुजलेला वास येत होता. त्याची फिकीर न करता त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला घाणीतून उचलून बाजूला केले. पाणी आणून त्याला पाणी व फिनेलने  आंघोळ घालून त्याची स्वच्छता केली. त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घेतले.आणि चांगले कपडे घालून त्याला  उपचारा करिता राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट