लाॅकडाऊन काळात नेरळ पोलिसांची धडक कारवाई! नेरळ हद्दीतील बेकरे जंगलात हातभट्ट्या केल्या उध्वस्त! नेरळ पोलिसांचा मोर्चा थेट दारुवाल्याकंडे!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु असुन नेरळ परीसरात कडकडीत बंद पाळला जात आहे. तसेच देशात लाॅकडाऊन असल्याने संपुर्ण देशात जमावबंदी आणि संचारबंदी आदेश लागु आहेत. असे असतानाच या लाॅक डाऊन कालात वाईन शाॅप व अन्य दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली असतानाच येथिल बेकरे गावाचा जंगलात हातभट्टया लावण्यात येत असल्याची माहीती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस अधिकारी अविनाश पाटील यांनी नेरळ पोलिस ठाण्याचे एक पथक बनवुन जगंलात जावुन या दारुभट्टया उध्वस्त केल्या.

 या बाबत नेरळ पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार कर्जत तालुक्यांतील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील बेकरे गावातील डोंगराचा पायथ्याशी ओहोळामधे विनापरवाना गैरकायशीर गावठी हातभट्टीची दारु तयार करणेकरता लागणार गुळमिश्रीत  रसायन लपुन ठेवल्याची माहीती नेरळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नेरळ पोलिस ठाणेचे पोलिस  अधिकारी अविनाश पाटील यांनी रायगड पोलिस अधिक्षक आणि कर्जतचे उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांना घेवून थेट जंगल गाठले. यावेळी या जंगलातील दारुभट्टया उध्वस्त केल्या आहेत. यामधे ८ प्लॅस्टिक व पत्राचा २०० लिटरचा टाक्या, प्रत्येक टाकीत १५० लिटर प्रमाणे १२०० लिटर नवसागर मिश्रित रसायन टाक्यासंह किंमत अंकाचे ४९६०० रुपये, तसेच १२ प्लास्टिक व पत्र्याचे २०० लिटर क्षमतेचा टाक्या त्याचे मध्यभागी गोळ अाकाराचे मोठे होळ पडलेल्या टाक्या अंदाजे किमंत २४०० रुपये असा एकुण ५२ हजार रुपयाचा माल जप्त केला.
 याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी निलेश मोहन वाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे. नेरळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजि नंबर ५८/२०२० अन्वेय मुंबई प्रोव्हीजन ॲक्ट ६५ (फ)८३ प्रमाणे बेकरे येथिल ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून या प्रकरणी नेरळ पोलिस आरोपांचा शोध घेत आहेत. दरम्यान लाॅक डाऊन कालात नेरळ पोलिसांनी आपला मोर्चा थेट दारु हातभट्ट्यावाल्यावंर वळविल्याने नेरळ पोलिसांचा या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी काल दुपारी ४ वाजताचा दरम्यान ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास नेरळ सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे अमंलदार जी एस गिरी व हवालदार मुनेश्वर हे करीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट