छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कटिबध्द- मुख्यमंत्री

महाराष्ट्रासह देशभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम महाराजांचे जन्मस्थान असलेल्या  शिवनेरी गडावर पार पडला. ढोल,ताशे,लेझिम,तुतारी आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी शिवजन्मोत्सव साजरा झाला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अजित पवार छगन भुजबळ,दत्ता भरणे, आदिती तटकरे आदी मंत्रीही हजर होते. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यास शासन कटिबध्द आहे असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
काल शिवजयंती निमित संपूर्ण देशभर विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवजन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम शिवनेरीवर झाला तर रायगडासह राज्यातील इतर किल्ल्यांवर ही शिवप्रेमींनी उत्साहात शिवजयंती साजरी केली. मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी शिवप्रभूंच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर सुहास वाडकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. यावेळी मुंबईमध्ये शिवकालीन देखाव्याचे दर्शन घडवणाऱ्या मिरवणूकाही निघाल्या. पुण्यातही लाल महालापासून शिवपालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल ताशे आणि जय शिवाजी जय भवानीचा जयघोष सुरू होता. औरंगाबाद मध्ये शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते. नाशिक,नागपूर,नगर,धुळे,वर्धा,बुलढाणा,सांगली, सातारा आणि कोकणातील चारही जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. अनेक ठिकाणी मिरवणुका निघाल्या तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राजधानी दिल्लीत ही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. लेझिम,मिलिटरी बँडच्या तालावर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी महाराष्ट्र सदन दुमदुमले. या कार्यक्रमाला १० देशांच्या राजदूत हजेरी लावली होती. खासदार संभाजी राजे यांनी सपत्नीक शिवजन्माचा पाळणा केला तसेच पालखीचे पूजनही केले यावेळी देशविदेशात आपल्या कार्य कर्तृत्वाची पताका डौलात फडकवणारे भारत विकास समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना खासदार संभाजी राजे यांच्या हस्तेछत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संसद भवन परिसरातील शिवप्रभूंच्या पुतळ्याला सकाळी पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली यावेळी खासदार अरविंद सावंत, हेमंत गोडसे,विकास महात्मे आदी हजर होते.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट