भीम आर्मीच्या सभेला परवानगी नाकारली..
भिडे, एकबोटेंसह ५८ जणांना कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी; अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेव बंद ठेवण्यात येणार आहे.
- by Adarsh Maharashtra
- Dec 29, 2018
- 1308 views
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची ३१ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यासाठी भीम आर्मीतर्फे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईतल्या सभेचे भवितव्य अधांतरी असून होणार की नाही याबाबत साशंकता आहे.
भिडे, एकबोटेंसह ५८ जणांना कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी
पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण ५८ जणांना ३१ डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.
पोलिसांनी सीआरपीसी कलम १४४ नुसार विविध संघटनांशी संबंधित असलेल्या ५८ जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी १७७ नुसार १८८ जणांना दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले असून सरार्इत २९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी नेमक्या कोणाकोणाला नोटिसा जारी केल्या आहेत याबाबत खुलासा करण्यास नकार दिला असून जुन्या रेकॉर्डवरील अनेकांची नावे यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेव बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबर्इ उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील जय स्तंभास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम