ताकारी, म्हैसाळ, टेंभू प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर,दुष्काळग्रस्तांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टेंभूचे काम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले - टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु. 4088.94 कोटीची सुप्रमा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात - ताकारीचे 13 हजार हे. म्हैसाळचे 42 हजार हे. आणि टेंभूचे 94 हजार हे. सिंचन बंदिस्त वितरिकेद्वारे - राष्ट्रीय महामार्ग 20 हजार कि.मी. कामांना मंजुरी, त्यापैकी 7 हजार कि.मी.ची कामे पूर्ण - धनगर समाजाला लवकरच आरक्षण देण्यास प्रयत्नशील - बिरोबा मंदिर विकासासाठी 15 कोटींची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Dec 24, 2018
- 1727 views
मुंबई:दुष्काळग्रस्तांना वरदान ठरणाऱ्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांना शासनाने गती दिली असून, टेंभूचेकाम गेल्या 4 वर्षात 100 टक्क्यांवर पोहोचवले आहे. या योजनेचा चौथा टप्पा पूर्ण असून, पाचवा टप्पा पूर्णत्वाकडे आहे. २०१९ पर्यंत कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी शासन कटिबध्द आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गतसिंचन योजना मुख्य कामे पूर्णत्वाची वचनपूर्ती आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत सांगली-सोलापूरमार्गावरील सांगली-बोरगाव-वाटंबरे-मंगळवेढा-सोलापूर मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलतहोते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा, लाभक्षेत्र मंत्री गिरीष महाजन, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रसासन, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार सर्वश्री पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील आणि रमेश शेंडगे, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील ताकारी - टेंभू आणि म्हैसाळ प्रकल्पाची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करून जिल्ह्यातील दुष्काळी भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी रु. 4959.91 कोटीची तर टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाची रु. 4088.94 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ताकारी म्हैसाळ टेंभू 1042 कि.मी. लांबीचे कालवे आहेत, मागील 20 वर्षात त्यापैकी केवळ 500 कि.मी. चे कालवे झाले, मात्र गेल्या 4 वर्षात 400 कि.मी.ची कामे पूर्ण करून सिंचनाची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था दुष्काळी भागात निर्माण केली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कालव्यांऐवजी बंदिस्त वितरिकेव्दारे पाणी वितरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यामध्ये ताकारी प्रकल्पांतर्गत 13 हजार हे. म्हैसाळ प्रकल्पांतर्गत 42 हजार हे. आणि टेंभू प्रकल्पांतर्गत 94 हजार हे. सिंचन बंदिस्त वितरिकेव्दारे करण्यात येत आहे. पुढील 6 महिन्यात हे काम पूर्ण करून दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा संकल्प आहे. बंदिस्त वितरिकेव्दारे सिंचन व्यवस्था निर्माण केल्याने शेत जमीन अधिग्रहण थांबले आहे. तसेच योजनेचा 800 कोटींचा खर्च कमी झाला आहे. कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ योजनेतील आगळगाव - जाखापूर उपसा सिंचन योजना, टप्पा 6 अ (अंकले) व टप्पा 6 ब (खलाटी) उपसा सिंचन योजनेची संकल्पना ते प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यापर्यंतची कार्यवाही विक्रमी वेळेत पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून पाण्याद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे. दुष्काळी भागात पाण्याचा थेंब न थेंब पोहोचेपर्यंत शासन शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दुष्काळी काळात उपसा सिंचन योजनेद्वारे सांगली जिल्ह्यातील 250 तलाव भरून घेतले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणणार आहे. यासाठी शासनाने 1 लाख सोलर पंप विकत घेतले असून ते शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम