
नियम धाब्यावर बसवून मसजिद बंदर मध्ये बेकायदा हॉटेल
◾ जागा मालक+चालक यांच्याविरोधात महापालिकेने एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी
- by Reporter
- Feb 01, 2024
- 253 views
मुंबई- मुंबईत अनेक ठिकाणी विना परवाना हॉटेल राजरोसपणे सुरू आहेत असेच एक हॉटेल काही दिवासापासून महापालिका बी विभागातील आरोग्य, लायसन्स, अग्निशमक दल आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या कृपा आशिर्वादाने ३० काझी सैय्यद स्ट्रीटवर विना परवाना जेवणाचे हॉटेल सुरू कोणत्याही विभागाची परवानगी नसताना बेकायदा हॉटेल सुरूच कसे होते? कोण आहे यामागचा सूत्रधार? जागा मालकावर परवानगी शिवाय अनधिकृत हॉटेल सुरू केल्या प्रकरणाचा ठपका ठेऊन महापालिकेनी एमआरटीपी कायद्या अंतर्गत जागेचा मालक+हॉटेल चालक विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी लोक करत आहेत.
म्हाडा ब-१ कडून दि-२७/०१/२०२० इमारत खाली करण्याची नोटीस प्रत
ही इमारत १०० वर्षापूर्वींची असून या जुन्या जिर्ण इमारतींला मागील चार वर्षापूर्वी म्हाडा ब-१ विभागाने पाहणीकरून धोकायदा ठरवल होत नंतर म्हाडाने कायदेशीररित्या इमारत खाली करण्याची नोटीस दिली होती खरी पण प्रत्यक्षात ती उभी आहे? पुढे त्या नोटीसीचे काय झाल? ते पण पहाण महत्वाच आहे. इमारत खाली न होता भरण्याचे काम सध्या सुरू आहे. या बेकायदा हॉटेलमध्ये अनेक लोक जेवणासाठी त्याजागी गर्दी होत असते. उद्या ही जीर्ण इमारत कोसळली तर मोठा अपघात होऊन अनेक निष्पापाचे बळी जाऊ शकतात याला महापालिका बी विभाग आणि म्हाडा ब-१ अधिकारी इतर प्रशासन यांच्यावर असेल अशी चर्चा स्थानिक रहिवाशी व्यापारी लोकांमध्ये होत आहे.
रिपोर्टर