उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच ; भाजपचा सफाया

उरण (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजपला चितपट केले आहे.तीनही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचापदासह सदस्यांचाही बहुमताचा आकडा पार करून निर्विवाद सत्ता काबीज केली आहे.उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगला होता.सरपंचासह १७ जागांसाठी पाच प्रभागातुन ३० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता.भाजपच्याच धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे.निवडणूकीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा बनला होता. याच मुद्यानी भाजपची नौका मतदारांनी अरबी समुद्रात बुडविली. निवडणूकीच्या प्रचारात भाजपच्या महेश बालदी, प्रशांत ठाकूर या दोन्ही आमदारांनीही जाहीर सभा घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा

संबंधित पोस्ट