
हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे जीवन चरित्र "सांडला कलश रक्ताचा" पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
बाबू गेनू यांची जीवनगाथा देशभक्तीची प्रेरणा देणारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2023
- 457 views
आंबेगाव(प्रतिनिधी) : हुतात्मा बाबू गेणु सैद यांचे जीवनावर आधारीत प्राध्यापक वसंतराव भालेराव सर लिखित सांडला कलश रक्ताचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या उपस्थित सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी लांडेवाडी येथे संपन्न झाला.
हुतात्मा बाबु गेणू युवा प्रतिष्ठान व प्राध्यापक वसंतराव भालेराव यांच्या माध्यमातून ५००० प्रती छापण्यात आल्या असून महाराष्ट्रातील विविध शाळेत व देशप्रेमी नागरिकांपर्यंत पुस्तक पोहचवण्यासाठी हुतात्मा बाबु गेणू युवा प्रतिष्ठान प्रयत्नशील आहे.
देशसेवेची प्रेरणा देणारे बलिदान १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांनी कारागृहाच्या यम यातना सोसल्या तर अनेकांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यावेळी महात्मा गांधींनी स्वदेशीचा स्वीकार आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कारचा नारा दिला.आणि सत्याग्रहाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला महात्मा गांधींच्या या प्रेरणेने प्रेरित होऊन महाळुंगे पडवळ गावचा २२ वर्षाचा तरुण या लढ्यात सामील झाला महाळुंगे पडवळ हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील छोटेसे गाव महाळुंगे पडवळ या गावाचा बाबू गेनू सैद हा तरुण आपल्या आईबरोबर उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला आला त्याने महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यावेळी ब्रिटन मधील मँचेस्टर मिलचे परदेशी कापड भारतात आणून विकले जायचे मुंबईमधील काळबादेवी रोडवरील हनुमान गल्लीत त्या परदेशी कापडाचे मोठे गोडाऊन असायचे म्हणजे ब्रिटनमधून जहाजाने आलेले ते परदेशी कापड मुंबईमधील काळबादेवी हनुमान गल्लीतील त्या गोडाऊनमध्ये ठेवले जायचे त्यानंतर मालमोटारी मध्ये भरून ते कापड भारतामध्ये विकण्यासाठी इतरत्र पाठवले जायचे १२ डिसेंबर १९३० रोजी अशा परदेशी कापडाच्या मालाच्या मोटारीला विरोध करण्यासाठी बाबू गेनू सैद हा तरुण त्या मोटार गाडीपुढे पुढे आडवा पडला आणि इंग्रज गोऱ्या साहेबांनी बाबू गेनू यांच्या अंगावरून ती गाडी नेली.महाळुंगे पडवळचा बाबू गेनू सैद हा देशभक्त हुतात्मा बाबू गेनू म्हणून सर्वांच्या हृदयात घर करून राहिला.त्या हुतात्मा त्या हुतात्मा बाबू गेनू यांची जीवनगाथा प्राध्यापक वसंत भालेराव यांनी सांडला कलश रक्ताचा या पुस्तक रूपाने लिहिली. महाळुंगे पडवळ गावच्याच ग्रामपंचायतीने सन १९७८ साली त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. सन २००८ साली हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मशताब्दीचे वेळी दुसऱ्या आवृत्ती प्रकाशित झाली,तिसरी आवृत्ती प्राध्यापक वसंत भालेराव यांनी प्रकाशित केली.आता या पुस्तकाच्या सर्व प्रति संपल्या आहेत. महाळुंगे पडवळ गावी हुतात्मा बाबू गेनू यांचे भव्य स्मारक महाराष्ट्र शासनाने उभारले आहे त्या स्मारकाला अनेक पर्यटक भेटी देत असतात.हुतात्मा बाबू गेणू युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले १६ वर्षे मुंबईहून हुतात्मा बाबू गेनू बलिदान ठिकाणापासून महाळुंगे पडवळ येथील हुतात्मा बाबू गेनू यांचे जन्मस्थानापर्यंत पायी प्राणज्योत आणली जाते अनेक गावांमध्ये या पुस्तकाची मागणी होत असते, म्हणूनच हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाबाजी चासकर यांनी या पुस्तकाची चौथी आवृत्ती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व शिवसेना उपनेते श्री शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत लांडेवाडी येथे पार पडला. वेळी हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे बबनराव सैद, लेखक प्रा.वसंतराव भालेराव, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर,सरपंच सुजाताताई चासकर मा. जि.प.सदस्य दादाभाऊ चासकर,प्रदीप डोके,संजय शिशुपाल,सचिन चासकर,उपसरपंच विजय मोढवे,सुरज पडवळ आदि. उपस्थित होते ही गोष्ट अतिशय समाधानाची आहे कारण हुतात्मा बाबू गेनू यांची जीवनगाथा देशप्रेम आणि देशभक्तीची प्रेरणा देणारी आहे. सदर पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. तरी मी "सांडला कलश रक्ताचा" या पुस्तकसाठी शुभेच्छा देत आहे.असे मुख्यमंत्री म्हणाले.यावेळी नवीन पिढीला इतिहास माहीत व्हावा म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व वाचनालयात हे पुस्तक जावे म्हणून निवेदन मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम