मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसान समृद्धी योजनेचे उद्घाटन

उरण (सुनिल ठाकूर ).केंद्र शासन कडून शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजने पाठोपाठ आता राज्य शासन कडून किसान समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेचा उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,कृषिमंत्री धनंजय मुंढे,कॅबिनेट मंत्री दादा भुसे  तसेच कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर पार पाडण्यात आले या कार्यक्रमासाठी पनवेल मधून कृषीअधिकारी बिचकुळे साहेब तसेच विमल पाटील ,अनिल वरे,नामदेव भोपी ,रघुनाथ भोपी ,नारायण कुंभार ,नारायण मढवी,पांडुरंग दाढावकर,परशुराम चोरघे या शेतकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिता साठी किसान योजना अंतर्गत वर्षाला ६००० हे ३ हप्त्या मधे २००० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्या मधे जमा होतात आज त्याचा १४ हप्ताचा वितरण झाल आणि आता या पुढे याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अशीच घोषणा करून या पुढे शेतकऱ्यांना ऐकून वर्षाला केंद्र शासन कडून ६००० आणि राज्य शासन कडून ६००० असे १२००० जमा होतील याचा शेतकऱ्याला शेतीसाठी उपयोग होईल. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांनी शेती विषयी माहिती दिली व शेती विकसित करण्याचे अवाहन करुन कार्यक्रमाची सांगता केली आणि निमंत्रित शेतकऱ्यांना  पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित  केले उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले .!!!

संबंधित पोस्ट