३१ जुलै मोहम्मद रफी स्मृतीदिन...सुरांचा बादशहा...मोहम्मद रफी.
- by Reporter
- Jul 22, 2023
- 232 views
मुंबई (भारत कवितके) " गरीबोंकी सुनो वो तुम्हारी सुनेगा,तुम एक पैसा दोगे वो दस लाख देगा," असे कधी भिकार्याच्या दीन, आर्त स्वरात कधी " जानेवालो जरा होशियार यहां के हम है राजकुमार. ." असे बेहोश,बेधुंद होऊन राजकुमार सारखी मस्तीभरी गाणी मोहम्मद रफी नी म्हटली.कधी प्रियेसीला छेडणारा प्रियकर तर कधी प्रियेसी साठी ह्ददयातून साद घालून गजल गाणारा प्रेमवीर,तर कधी भक्तीरसाने ओंथबून गाणारा भक्त,अशा अनेक भाव भावनांच्या छटांचे आपल्या सप्त स्वरातून मोहम्मद रफी नी पिसारे फुलविले.अशा या सुराच्या बादशहाचा जन्म २४ डिसेंबर १९२४ मध्ये अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुल्तान सिंह नावाच्या गावत झाला होता.अगदी लहानपणापासूनच त्यांना गुणगुणायची सवय होती.त्यांचा हा छंद पाहून त्यांच्या मोठ्या भावाने हमीदभाईनी त्यांना मनापासून प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.पुढे हमीदभाईनी मोहम्मद रफी ना संगीताची तालीम बडे गुलाम अली खानसाहब,उस्ताद खान अब्दुल वाहिदसाहब,मार्फत देण्यास सुरुवात केली. एकदा लाहोर मध्ये प्रसिद्ध गायक कुंदनलाल सहगल यांचा कार्यक्रम होता.
त्यावेळी कुंदनलाल सहगल समोर मोहम्मद रफीना हमीदभाईनी गाण्यास सांगितले. त्यावेळी कुंदनलाल सहगलने आशिर्वाद देत म्हटले," तू एक दिवस महान गायक होणार यात शंकाच नाही" .मोहम्मद रफीनी पहिले गाणे लाहोर मध्ये गायले होते.त्या गाण्याचे संगीतकार श्यामसुंदर होते.पंजाबी फिल्मचे नाव होते " गुलबलोच" .पुढे सन १९४८ साली महात्मा गांधीची हत्या झाल्यावर गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी रातभर जागून " बापू की अमर कहाणी" लिहीली.मोहम्मद रफीनी आपल्या दर्दभरी आवाजात बापू की अमर कहाणी. .. गाऊन भारतीय चित्रपटसृष्टीला आपली खास वेगळ्या पध्दतीने ओळख करुन दिली.त्यानंतर हमीदभाईनी मोहम्मद रफीना संगीतकार नौशादसाहब यांची भेट घडवून आणली.
नौशादनी मोहम्मद रफीना मिनर्व्हा मुव्हिटोन मध्ये जाऊन मीरसाहेबांना भेटायला सांगितले. त्यावेळी मोहम्मद रफी कडे बसने प्रवास करण्याइतपत पैसेही खिशात नव्हते.त्यावेळी " दिल्लगी" चे निर्माण चालू होते.यामध्ये मोहम्मद रफी नी नौशाद साहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायली." तेरे कुचेमें अरमानोंकी दुनिया लेके आया हूं" आणि" इस दुनियामें ऐ दिलवालो दिल का लगाना खेल नही" या दोन्ही गाण्याना प्रचंड प्रसिद्धि मिळाली.त्यानंतर " बैजू वावरा"चित्रपटातील गाण्यानी भारतभर धमाका उडविला.प्रत्येकाच्या तोंडी बैजू वावराची गाणी रेंगाळू लागली.प्रत्येक प्रियकर आपल्या प्रियेसीला प्रेमपत्रातून लिहू लागला.गुणगुणू लागला." तू गंगा की मौज मै जमुना का धारा ...हो रहेगा मिलन ये हमारा तुम्हारा" ," खिलौना" मधील संजीवकुमार वर चित्रीत केलेले " खिलौना जानकर तुम तो मेरा दिल तोड जाते हो..." हे गाणे मोहम्मद रफी नी गायले,हे गाणे म्हणजे संपूर्ण खिलौना चित्रपटाचा आत्माच वाटतो."पगला कही का" मधील शम्मी कपूरवर चित्रीत केलेले" हां....तुम मुझे यूं भुला ना पाओगे.." हे गाणे मनाचा ठाव घेते.मनाचा तळ ढवळून काढते." एक फूल दो माली " मधील विविध मूडमधील गाणी आजही प्रेक्षकांना भुरळ पाडतात." जंगली" मधील " एहसान तेरा होगा मुझपर.." ," सूरज" मधील " बहारों फुल बरसाओ...." "जिने की राह " मधील " आनेसे उसके आये बहार..." ,"राम और शाम " मधील " आज की रात मेरे दिलकी सलामी लेले..." ,"संगम" मधील " यह मेरा प्रेमपत्र पढकर...","राजा और रंक " मधील "ओ फिरकीवाली कल फिर आना..." ,"लोफर" मधील " आज मौसम बडा बेईमान है..."," वक्त" मधील " वक्तसे कल और आज...","पत्थर के सनम" मधील " पत्थर के सनम तुझे हमने ..." ,"कटी पतंग" मधील " कोई नजराणा लेकर....","हाथी मेरे साथी " मधील " नफरत की दुनिया को छोडकर..","राजकुमार " मधील," तुमने किसीकी जान को जाते हुऐ देखा...","धर्मवीर" मधील " ओ मेरी मेहबूबा..." ,"हवस "मधील " तेरी गलीयो में ना ...."," गबन" मधील " एहसान मेरे दिलपे तुम्हारा है दोस्तो..."," हम साया" मधील " आपके पहलूमें आके रो दिऐ...","ससुराल " मधील " तेरी प्यारी प्यारी सुरत को....","दो रास्ते" मधील " ये रेशमी जुल्फे...","हम किसीसे कम नही" मधील "क्या हुआ तेरा वादा..."," हसते जख्म" मधील " तुम जो मिल गये हो....","हिर रांझा" मधील " ये दुनियाये महफिल....","" भरोसा " मधील " इस भरी दुनिया में कोई भी हमारा ना हुआ....","निल कमल" मधील " बाबुल की दुवा लेती जा....","प्यार ही प्यार " मधील " मै कही कवि नाबन जाऊं...","गीत " मधील "आजा तुझको पुकारे मेरे गीत रे..." अशा प्रकारची अनेक गाणी मोहम्मद रफी नी गायली व अजरामर केली.आपल्या संगीत प्रवासात मोहम्मद रफी नी सर्वच संगीतकारा बरोबर गाणी गायली आहेत.आणि सर्व कलाकाराना आवाज दिला आहे. त्यांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या कलाकारासाठी गाणे गाऊन त्या कलाकाराच्या आवाजामध्ये आपला आवाज फिट्ट बसवित.दिलीपकुमारसाठी दर्दभरीगाणी गात तेव्हा वाटायचे दिलीपकुमारच्याच गळ्यातून गाणे येते आहे त्या उलट मोहम्मद रफी जानी वाकरसाठी विनोदी गाणेगात त्यावेळी वाटायचे जानी वाकरच गात आहे.मोहम्मद रफी मितभाषी होते,खूपच कमी बोलणारे,त्यांच्या बद्दल कुणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार नव्हती.फक्त रायल्टीच्या मुद्यावर लता मंगेशकर यांचेशी मतभेद होता.पण खूपच कमी काळ पर्यंत .रागिणी तील मन मोरा बाबरा हे गाणे त्यांनी प्रसिद्द गायक किशोरकुमार साठी गायले,तर लालारुख या चित्रपटातील " हे कली कली के लबपर तेरे हुस्न का फसाना..." हे गीत मोहम्मद रफी नी गायक तलत मेहमूद साठी गायले.मोहम्मद रफी नी सर्वांत अधिक गाणी नौशाद व लक्ष्मीकांत प्यारेलाल बरोबर गायली.३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी आपल्या परीवाराला,संगीतप्रेमीना ,सर्व मित्रांना,नातेवाईकांना रडवून अनंत यात्रेला निघून गेले की जेथून पुन्हा कोणीही परत येऊ शकत नाही..." हां....तुम मुझे यूं भुलाना पाओगे,.....
रिपोर्टर