रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स व कॉमर्स महाविद्यालय, महालण विभाग, फुंडे येथे आरोग्य शिबीर संपन्न.

उरण (सुनिल ठाकूर ) वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभाग व हेल्थ सेंटर मार्फत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. आमोद  ठक्कर   प्राणिशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. डॉ मोनाली चासकर, हेल्थ ऑफिसर यांनी  सर्व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक माहीती देऊन उत्तम आरोग्य यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कशी आहे त्याबद्दल  मार्गदर्शन केले .

या वेळेस ५७ विद्यार्थी व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली व विद्यार्थ्यांना आवश्यक  ते समुपदेशन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. प्राचार्य डॉ.पी. जी. पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेल्थ सेन्टर  चे  प्रमुख श्री पंकज भोये यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्रेया पाटिल,डॉ. जावळे आर. एस. यांनी सहकार्य केले.

संबंधित पोस्ट