राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या भा.ज.पा प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम !

भीमाशंकर (मंगेश फदाले ) बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकराचे दर्शन घेऊन आगामी लोकसभा निवडणुकितील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी आपल्या शिरूर मतदार संघातील जनतेला गावोगावी जाऊन भेटण्याचा कार्यक्रम सोमवार दि. 12 जूनला सुरू केला !

आपल्या एक्टिंग प्रोफेशनला सांभाळून डॉ.अमोल कोल्हे हे दर शनिवारी मतदार संघातील आपल्या मूळ गावी अर्थात नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात दिवसभर जनतेच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण नियमाने करत होतेच , परंतु राष्ट्रवादी काँग्रेस कडून आपली लोकसभेची तिकीट अधिकृतपणे कन्फर्म होताच खासदार डॉ.अमोल कोल्हे शिरूर मतदार संघात रिअॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे अमोल कोल्हे हे भा.ज.पा.च्या तिकिटावर शिरूर मधून लोकसभा निवडणूक लढवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमोल कोल्हे यांना पुन्हा शिरूर मधून लोकसभेची उमेदवारी देणार नाही ; अशा अफवांना आणि विरोधकांच्या नकारात्मक , खोट्या प्रचाराला आता पूर्णविराम लागला आहे, हे महत्वाचे.

शिरूर लोकसभा उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्यासोबत यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील हे देखील या गाव भेट कार्यक्रम दौऱ्यात मार्गदर्शक भूमिकेत प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क अभियानात निश्चितच दिलीप वळसे-पाटील यांची प्रत्यक्ष हजेरी ही खूप उजवी ठरणार असून त्याचा सकारात्मक उपयोग हा कोल्हेंच्या लोकसभा विजयासाठी निश्चितच होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

"आसाणे या आदिवासी भागातील गावात वळसे-पाटील साहेबांसोबत गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने गेलो असता ग्रामस्थांनी आमचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. या सर्वांशी आपुलकीने संवाद साधला." अशी माहिती अमोल कोल्हे यांनी यावेळी दिली !

"श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नतमस्तक होऊन मतदारसंघातील गावभेट दौऱ्याला सुरुवात केली. दिवसभरात अनेक गावांना भेट देऊन स्थानिक समस्या जाणून घेत सर्वांशी संवाद साधला" , असे  महाराष्ट्राचे मा. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

पावसाचा हंगाम सुरू झाल्यावर आपल्या भागातील जनतेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची  संपूर्ण तयारी असायला हवी. यासोबतच सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला आहे. त्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थितरित्या नियोजित करण्याची सूचना वळसे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या दौऱ्यात दिल्या.

पंचायत समितीची आढावा बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येईल. ज्यामध्ये स्थानिक पातळीवरील बरीचशी कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे वळसे-पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासित केले.

संबंधित पोस्ट