कळंबोली वाहतूक शाखेची धडाकेबाज कामगिरी!नियमांचे उल्लघंन करणा-या एकुण २५,४९२ कसुरदार वाहनचालक कायदेशीर कारवाई.

मार्च २०२३ ते मे २०२३ या कालावधीत एकूण १,९१,११,१०० इतका दंड वसुल.

पनवेल दि ३(सुनील भोईर )श्री. तिरुपती काकडे, मा. पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई व श्री. राहुल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. हरीभाऊ बानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा यांनी अधिनस्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सहायाने कळंबोली वाहतूक शाखेच्या हददीत माहे मार्च २०२३ ते मे २०२३ या तीन महिन्यांचे कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लघंन करणा-या एकुण २५,४९२ कसुरदार वाहनचालक यांचेवर मोटार वाहन कायदयाच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

त्यामध्ये एकुण १,९१,११,१००/- इतका दंड आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी रु. १५, ४९, १५०/- इतका दंड कसुरदार वाहन चालक/ मालक यांचेकडुन वसुल करण्यात आलेला आहे.तसेच हददीत मॅकडोनाल्ड येथे थांबणारे बसचालक हददीतील रिक्षाचालक, वाहनचालक व वाहतूकदार संघटना यांचे बैठका घेवून त्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली असून नियमांचे पालन करणेबाबत समज देण्यात येत आहे. सदरच्या कारवाईमुळे कसुरदार व वाहतूक नियमांचे उल्लघंन करणारे वाहनचालक यांचेमध्ये वाहतूक नियमांचे पालन होत असल्याचे दिसुन येत आहे. भविष्यात देखील वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचे कसुरदार वाहनचालक यांचेविरूध्द जास्तीत जास्त कारवाई करण्यात येत आहे.अशी माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी दिली. सर्व नागरीक, चालक यांनी वाहतूक नियमांचे पालन करून नवी मुंबई वाहतूक विभागास सहकार्य करावे.असे आवाहन हरिभाऊ बानकर यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट