माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांचा विधानसभेत खळबळजनक दावा
भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीबद्दल अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडिमामध्ये पसरवल्याचा आरोपही गोटे यांनी केला आहे.
- by Adarsh Maharashtra
- Nov 28, 2018
- 1036 views
मुंबई- भाजपविरोधातच बंड पुकारणारे आमदार अनिल गोटे यांनी विधानसभेत धक्कादायक खुलासा केला आहे. अनिल गोटे म्हणाले, माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, मोबाइल फोनवर आलेल्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अनिल गोटे यांनी विधानसभेत सांगितले. तसेच भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीविषयी अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडियावर पसरवल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी केला आहे. अनिल गोटे यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातील अवधान गावात भाषण करत असताना माझ्यावर देशी कट्ट्यातून नेम धरला होता, पण एका अज्ञात डॉक्टराने कट्टा हिसकावून घेतल्याने माझे प्राण थोडक्यात बचावल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. याबाबत धुळेच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवूनही अद्याप कारवाई झाली नाही.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम