रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टकडून मोफत रुग्णवाहिका सेवा!मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल- स्व. मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठ्यातील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका रूजू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच भजनी मंडळाला वाद्य साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्थेची भेट मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आली. कामोठे सेक्टर ३५ येथील श्री गणेश मंदिरात हा समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास उपस्थित राहून श्री. रवि जोशी आणि रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांना पुढील वाटचाली-साठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी यापुढेही असेच उत्तमोत्तम कार्य करत राहावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

संबंधित पोस्ट