पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना रामदास शेवाळे यांच्या प्रयत्नातून सुरू होणार सायन पनवेल हायवे लगतचे भुयारी मार्ग
- by Reporter
- Dec 09, 2022
- 750 views
पनवेल - सायन हायवे लगत असणारे भुयारी मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना रामदास शेवाळे यांनी आज पीडब्ल्यूडी अधिकारी पाजरे साहेब यांच्याशी बैठक करून सर्व भुयारी मार्ग लवकरात लवकर जनतेसाठी सुरू करण्यात यावे अशी सुचना निवेदन दिले जेणेकरून हायवेला होणारे अपघात कमी होतील आणि जनतेसाठी प्रवास सुखरूप होईल ही बाब देखील रामदास शेवाळे यांनी पीडब्ल्यूडी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली पीडब्ल्यूडी अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे की संबंधित खात्याचे सचिव यांची मंत्रालय येथे रामदास शेवाळे यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करून सर्व भुयारी मार्ग लवकरात लवकर जनतेसाठी खुले केले जातील अशे आश्वासन पीडब्ल्यूडी अधिकारी पाजारे यांनी दिले

रिपोर्टर