
कळंबोली सेक्टर ५ येथील गार्डन मधील झाडांसाठी जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल महापालिका आयुक्तांची घेतली भेट
- by Reporter
- Nov 26, 2022
- 478 views
पनवेल : कळंबोलीतील सेक्टर ५ येथील पनवेल महानगर पालिकेने दोन कोटी ७० लाख रुपये खर्च करून फुलवलेल्या बागेतील रोपे पाण्याअभावी मरण अवस्थेत जात असल्याने तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश त्वरित द्यावेत यासाठी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी आज श्री.गणेश देशमुख आयुक्त पनवेल महानगरपालिका यांची भेट घेऊन निवेदन पत्र दिले यावर आयुक्तांनी त्वरित दखल घेत उद्या एका दिवसात व्यवस्था करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
याप्रसंगी सोबत पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण व सहकारी सुमित सुर्यवंशी देखील उपस्थित होते.
रिपोर्टर