बहुजन युथ पॅथरचे कार्यालय नाही, तर हे न्यायालय व्हावे;- भाईसाहेब जाधव!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- कोणावरही  खोट्या ॲट्रोसिटी दाखल करु नका, उपेक्षितांना, पिडीतांना न्याय मिळवुन द्या, सत्यासाठी लढा, बाबासाहेबांचे विचार पुढे घेवुन चला, बहुजन युथ पॅथरचे हे कार्यालय, कार्यालय न राहता न्यायालय ठरावे, असे प्रतिपादन बहुजन युथ पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांनी केले आहे,

रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात आज बहुजन युथ पॅथरचा कार्यालयाचे उद्धाटन मोठ्या थाटामाटात भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते पार पडले, त्या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष भाई साहेब जाधव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते, यावेळि कर्जत तालुक्यांतील रिपाइचे संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, कर्जतचे रिपाइंचे तालुकाअध्यक्ष हिरामणदादा गायकवाड, बहुजन युथ पॅथरचा महीला अध्यक्षा सीमाताई सपकाल, बहुजन युथ पॅथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष पॅथर प्रविण रोकडे, रिपाइंचे युवक अध्यक्ष अमर जाधव, सचिन भालेराव, सुमित सुर्वे यांसह विविध आंबेडकर चळवळीतील मान्यवरांनी या कार्यालय उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती लावली होते. या कार्यालय उद्घाटन सोहळ्यात कोरोना कालात सुमारे १५० म्रुतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पत्रकार बाळु गुरव यांचे स्वागत भाईसाहेब जाघव यांनी केले आहे. 

कर्जत तालुक्यांत युथ पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांची एन्ट्री होताच बहुजन युथ पॅथरचा पदाधिकाऱ्यांनी भाई साहेब जाधव यांचे फटाक्याची आतषबाजी व घोषणा देत जंगी स्वागत केले आहे, यावेळि भाईसाहेब जाधव यांनी या कार्यालयात पिडीत आल्यास त्याला न्याय मिळावणासाठी बहुजन युथ पॅथरचा पॅथरने पुढे जावे, तसेच येथे आल्यानंतर आडल्या नडल्यांना न्याय मिळावा, हे कार्यालय न राहता न्यायलय व्हावे, असा मोलाचा सल्ला भाईसाहेब जाधव यांनी बहजुन युथ च्या पॅथरना दिला आहे, युथ पॅथरचा या कार्यालय युथ पॅथरचे नसुन हे समाजाचे कार्यालय आहे, असे मत यावेळि प्रविन रोकडे यांनी व्यक्त केले, हे 

दरम्याना या कार्यालय उद्घाटन सोहळा यशस्वी पार पडावा याकरता बहुजन युथ पॅथरचे रायगड जिल्हा अध्यक्ष पॅथर प्रविण रोकडे, कर्जत तालुका अध्यक्ष पॅथर बॅाबीशेठ वाघमारे, कर्जत शहर अध्यक्ष आकाश कांबळे, नेरळ शहर युथ पॅथरचे अध्यक्ष विवेक पवार यासंह बहुजन युथ पॅथरचा सर्व कर्जत खालापुर तालुक्यांतील युथ पॅथरनी मेहनत घेतली होती,

संबंधित पोस्ट