जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जवाहर नवोदय विद्यालय नियोजन व सल्लागार समितीची बैठक संपन्न!
- by Reporter
- Nov 22, 2022
- 344 views
रायगड(धर्मानंद गायकवाड):- जवाहर नवोदय विद्यालय, रायगड यांची विद्यालय नियोजन समिती (Vidyalaya Administration Committee) आणि विद्यालय सल्लागार समिती (Vidyalaya Advisory committee) यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि.21 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व विद्यालयाच्या वतीने प्राचार्य किरण इंगळे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे, उपप्राचार्य शिरीष जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉ.रवींद्र रोकडे, नवोदय विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक नितीन बुधगे, शैलेश पडवळ, गणेश अडोडे, श्री.कडू, लोकसभा खासदार सुनिल तटकरे यांचे प्रतिनिधी तुकाराम सुतार, शिक्षक पालक संघटनेचे सदस्य नितीन बडे हे उपस्थित होते.
या बैठकीत विद्यालयाकरिता सांस्कृतिक सभागृहसोलार लाईट योजना, विद्यालयातील आपातकालीन स्थितीसाठी वाहन व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय चाचण्या आणि वैद्यकीय शिबिर, विद्यालयाचे लँडस्केपिंग, विद्यालयाच्या मैदानांची दुरुस्ती इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विद्यालयात वैद्यकीय शिबीर घेण्याची सूचना प्राचार्यांना दिली.

रिपोर्टर