राहुल गांधीच्या विरोधात कळंबोली शहर मनसे आक्रमक

पनवेल : स्वातंत्र्यवीर  विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या विधाना-विरोधात राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी आज  कळंबोली शहर अध्यक्ष/पनवेल महानगरपालिका उप शहर अध्यक्ष श्री अमोल बोचरे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली मनसे  कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, निदर्शने करण्यात आली.

त्यावेळी मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री संदेश ठाकुर, मनसे रायगड उप जिल्हा अध्यक्ष श्री प्रवीण दळवी, महाराष्ट्र नवनिर्माण वहातुक सेना मावळ लोकसभा उपाध्यक्ष श्री भगवान खताळ,  श्री गिरीश तिवारी  माजी  जिल्हा अध्यक्ष सहकार सेना,  श्री विवेक बोराडे कळंबोली शहर अध्यक्ष सहकार सेना, संदिप अग्रवाल शहर अध्यक्ष मनसे प्रणीत मराठी कामगार सेना, जयसिंग पाटील रायगड जिल्हा सहचिटणीस, धनंजय शेंगार,अक्षय कोळेकर पनवेल महानगरपालिका उप शहर अध्यक्ष, श्री रामा सावंत, श्री अभिजित धुमाळ, यांना पुणे मुंबई हायवे रोखल्या अटक करण्यात आली

संबंधित पोस्ट