भाजपाला महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्यायची नाही! पळुन गेलेल्या ५० आमदारांनी मतदारांचा विश्वासघात केला;- सुषमा अंधारे!

कर्जत(धर्मानंद गायकवाड ) ;- पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे. भारतीय जनता पक्षाला वाटतंय ही देशाची आर्थिक राजधानी मुंबई त्यांना लुटायची ही आहे,मुंबई देशाची छोटी प्रकृती आहे, अस्मिता आहे, मुंबईला महाराष्ट्रा पासून तोडून गुजरातला जोडायची आहे व कोकणातील सिंधुदुर्गचा भाग गोव्याला जोडायचा हीच खरी रणनीती भाजपची आहे. देवेंद्र एक प्रकारचे कुटील राजकारण करीत आहेत. निवडून आलेल्यांचे राज्य सत्तेत असते. निवडून आलेले फोडून राज्य स्थापन करायची पद्धत नाही. भाजपच्या असुरी सत्ताकारणाला रोखण्यासाठी मी विधिवत शिवसेनेत प्रवेश केला आहे, पळून जाऊन नाही. किरीट सोमय्या भाजपसाठी किती फिरतात त्यांना खरे तर भाजपने मंत्री केले पाहिजे. तुमच्यात येणाऱ्यांना तुम्ही मंत्री करता मग तुमच्यातल्यांना का करीत नाहीत. भाजपाला द्वेषाचे पीक आणून जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्यायची नाही मात्र महाराष्ट्रच त्यांना पुरून उरेल असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे, तसेच पळुन गेलेल्या ५० आमदारांनी पक्षप्रमुखांचा नाही तर मतदारांचा विश्वासघात केला आहे, असेही त्या म्हणाल्या, सुषमा अंधारे कर्जतमधे बोलत होत्या. 

कर्जत मधील रॉयल गार्डनच्या खुल्या रंगमंचावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या 'शिवालय' कर्जत विधानसभा मतदार संघ शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याचे आणि शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते शिवालय कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हा महिला संघटक सुवर्णा जोशी, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, सह संपर्क प्रमुख भाई शिंदे,माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माजी सभापती सुजाता मनवे, अनिता पाटील, सल्लागार नवीन ढाकवळ आदी उपस्थित होते. कर्जत तालुकाप्रमुख उत्तमशेठ कोळंबे व खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी सुषमा अंधारे यांनी आपण पक्षात प्रवेश केला तेंव्हा शिवसेना उभी करण्यासाठी संधी द्या. असे उद्धव ठाकरेंना सांगितले. माझ्यावर माझ्या चळवळीतील माणसे टीका करीत होती. परंतु मी त्यांना आपली माणस म्हणून समजावून सांगीतले. परंतु तुम्ही रात्री पळून गेलात. मी संविधानाची चौकट काय आहे ते सांगत असते. जे गेलेत त्यांच्यात हिम्मत असेल तर समोर या. समान नागरी कायदा असावा असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते. वडिलांच्या इस्टेटीत मुलीला वाटा मिळावा, नवऱ्याच्या इस्टेटीत बायकोचा वाटा, अविवाहित महिलेला दत्तक मूल घेणे, घटस्फोटा नंतरही बायकोला पोडगी मिळावी. हेच समान नागरी कायद्यात आहे. आम्ही मोदी आणि शहांच्या मुजोरीला भीक घालत नाही. भाजपकडे कोण आहेत? त्यांनी आमची तयार पर्सलेच घेतली आहेत. सध्या भाजप मध्ये आहेत त्यांनी कोणकोणत्या पक्षात किती उड्या मारल्यात हे पहिले बघा, हमारी बिल्ली हमसे मॅव. शिवसेना सोडून पळालेल्या 50 आमदारांनी पक्ष प्रमुख यांचा नाही तर या आमदारांना ज्यांनी मते दिली त्या मतदारांचा विश्वासघात केला आहे.' त्यांनी आपल्या भाषणात नवनीत राणा, राज ठाकरे, आशिष शेलार आमदार महेंद्र थोरवे यांचाही खरपूस समाचार घेतला.

यावेळि उपनेते अल्ताफ शेख यांनी मी नावाने मुस्लिम असलो तरी मी आधी महाराष्ट्रातील मराठा आहे, मग मुस्लिम आहे जे शिवसेना संपवायला निघालेत त्यांना मी सांगू इच्छितो महाराष्ट्राने आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही संपवली. आता दिल्लीला बसलेल्या अमित शहाने इकडे फडणवीस नावाचा अफजलखान पाठवला आहे परंतु आम्ही त्यांची पळता भुई थोडी करू. तुम्ही जे गेलेत ती भाजपरूपी पुतना मावशी फक्त विषच ओकेल व तुम्हाला तुमची जागा दाखविल. आता निळा व भगवा एक झाला आहे. किंतेही रंग आम्हाला चालतील सर्वांनी एकत्र येऊन त्यांची जागा दाखवा.' असे आवाहन केले. सुनील पाटील, उमेश गावंड, बाबू घारे, सुदाम पवाळी, एकनाथ पिंगळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, राजाराम शेळके, विलास सांगळे, परशुराम म्हसे, विजय गायकवाड, सारिका शेट्टे आदींच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे व्यासपीठावरील मान्यवरांनी स्वागत केले.

याप्रसंगी राजेश जाधव, संतोष पाटील, प्रथमेश मोरे, उपतालुका प्रमुख रामदास घरत, सुधाकर देसाई, सुरेश गोमरे, ज्ञानेश्वर भालीवडे, संपत हडप आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





संबंधित पोस्ट