वैजनाथ देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणी महसुलमंत्र्याकडे करणार चौकशीची मागणी;- भाजपा नेते किरीट सोमय्या!
- by Reporter
- Nov 17, 2022
- 489 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तहसिल कार्यालयात आज भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज भेट दिली आहे, यावेळी कर्जत तालुक्यांतील वैजनाथ देवस्थान च्या जमिनीच्या गैर व्यवहारा बाबत माहिती घेण्यासाठी सोमय्या यांनी येथे भेट दिली असल्याचे सांगितले आहे. दरम्याव कर्जतचे तहसीलदार डॅा. शितल रसाळ यांच्याशी सोमय्या यांनी चर्चा करून या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासमवेत कर्जत तहसिल कार्यालयात भाजपाचे नेते सुनील गोगटे, तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, अशोक ओसवाल, संजय कराळे, प्रमोद पाटील, स्नेहा गोगटे, बिराज पाटकर, सर्वेश गोगटे यांसह भाजपाचे बहुसंख्य कायकर्ते उपस्थित होते.
दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे श्रीधर पाटणकर यांनी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेतां सदर जमिनीची खरेदी विक्री केल्याचा आरोप येथे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच वैजनाथ देवस्थानची जमिन कशा हस्तातंरीत झाल्या याबाबतची चौकशी करणेची मागणी राज्याचे महसुल मंत्री राधेक्रुष्ण विखे पाटील यांच्याकडे करणार असल्याचेही भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
रिपोर्टर