
शेतकऱ्यांनी गिरविले बीज-प्रक्रियेचे धडे!
- by Reporter
- Nov 16, 2022
- 344 views
रायगड(धर्मानंद गायकवाड);- युनायटेड वे मुंबईच्या जल संजीवनी प्रकल्प कर्जत अंतर्गत शेतकऱ्यांसाठी बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक वारे ग्रामपंचायतमधील कुरुंग गावात तसेच अंभेरपाडा ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
समूह संघटक विवेक कोळी यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली आणि कृषि तज्ज्ञ जोएब दाऊदी यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगून FIR (Fungicide, Insecticide Rhizobium ) क्रम अर्थातच आधी बुरशीनाशकाची प्रक्रिया त्यानंतर कीडनाशक आणि सगळ्यात शेवटी रायझोबियम कल्चर उपचार करीत स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीज प्रक्रिया करतांना सर्वप्रथम प्राधान्य आपल्या आरोग्याला द्यावे. उदा.रासायनिक किंवा जैविक साहित्यांच्या सरळ संपर्क आपल्या शरीराशी टाळावा. रसायनाचे वास घेणे, हाताने ढवळणे इ. करू नये. मास्क आणि हातमोजे यांचा वापर अनिवार्य करावा. प्रक्रिया केलेले बियाणे फक्त आणि फक्त पेरणीसाठी असून लहान मुल, जनावर इ.पासून दूर ठेवावे आणि जास्त काळ तसेच न ठेवता त्वरित सावलीत सुकवून पेरून द्यावे अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या प्रसंगी युनायटेड वे मुंबई जल संजीवनी प्रकल्प कर्जतचे व्यवस्थापक प्रदिप क्षीरसागर, उपव्यवस्थापक मुक्ताजी कांबळे, शेतकरी तुकाराम गणपत तिटकारे, केशव कृष्णा धादवड, बळीराम महादू लांघी, रामचंद्र बाबू सुपे,पांडुरंग बाबू लांघी, मारुती पांडू असवले, उमाजी राघव बांबळे, ग्रामसेवक महेन्द्र कुंटे, रा.जि.प.प्रा. शिक्षक अंभेरपाडा तानाजी गव्हारी, कुरुंग येथील ग्रामस्थ कांचन भोईर,ज्योती कोशिंबे,सोनी भोईर, राही भोईर, भाऊ कोशिंबे, अशोक भोईर, लक्ष्मण भोईर, चंद्रकांत भालेराव, राकेश पाटील, गजानन भोईर,मदन भालेराव,दिपक भोईर,महेश भोईर यांची उपस्थिती होती. तसेच युनायटेड वे मुंबई-जलसंजीवनी प्रकल्प कर्जतचे कार्यक्षेत्र अधिकारी संतोष काठे, कुंडलिक पादीर आणि अमर पारधी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
रिपोर्टर