कर्जत नगरपरिषद मध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी!

कर्जत (धर्मानंद गायकवाड);- बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स 1895 साली लढा उभारला.

इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला होता.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी रविंद्र लाड, बापू बहिरम, अविनाश पवार, दयानंद गावंड, हरिश्चंद्र वाघमारे, ह्र्दयनाथ गायकवाड, निलेश देशमुख, कल्याणी लोखंडे, विभावरी म्हामूणकर,दिलीप लाड, बाळा निकाळजे,शेखर लोहकरे, रुपेश पाटील, महेंद्र पवार, सुदेश गायकवाड, सामिया चौगुले, मुकेश परदेशी, जयवंत उघडा, महेश दाभणे आदी सह नगरपरिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होता.




संबंधित पोस्ट