
पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व कर्जत नगरपरीषद प्रशासनातर्फे अभिवादन!
- by Reporter
- Nov 14, 2022
- 267 views
रायगड(धर्मानंद गायकवाड)- भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसिलदार विशाल दौंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाअधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान कर्जत नगरपरीषदेचा वतीनेही माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांना कर्जतचा नगराध्यक्ष सौ. सुवर्णा जोशी तसेच मुख्याधिकारी वैभव गारवे यांचाहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी कर्जत नगरपरीषदेचा नगरसेविका मधुरा चंदन, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, मनिष गायकवाड, रविंद्र लाड, अविनाश पवार, सुदाम म्हसे,हृषिता शिंदे, सायली निंबरे, शेखर लोहकरे, सामिया चौगुले आदी सह नगरपरिषद कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
रिपोर्टर