रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात भारतभर जागरूकता व संपर्क अभियानाचे आयोजन!

रायगड(धर्मानंद गायकवाड)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्याकडील निर्देशाप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.31 ऑक्टोबर ते दि.13 नोव्हेंबर 2022 पर्यंत संपूर्ण भारतात “भारतभर जागरूकता व संपर्क अभियान (Pan India Awareness & Outreach)” चे आयोजन करण्यात आले आहे. 

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग व रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, जुने पनवेल येथे विधी सेवा शिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 या शिबिरामध्ये रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या योजनांची माहिती एकाच छताखाली सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती एस.एस.सावंत यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट