कामोठे पोलीस स्टेशनला भरली विद्यार्थ्यांची शाळा संपुर्ण पोलीस स्टेशन दर्शन !

कामोठे पोलीस स्टेशनला होत असलेल्या कामकाजा बद्दल वपोनि सौ स्मिता जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

कामोठे : कामोठे पोलीस स्टेशनला भरली विद्यार्थ्यांची शाळा संपुर्ण पोलीस स्टेशन दर्शन ! दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामोठे पोलीस स्टेशन वतीने शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण पोलीस स्टेशन दर्शन सोबत पोलीस स्टेशनला होत असलेले संपूर्ण काम दाखवण्याचा उपक्रम कामोठेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षिका सौ स्मिता जाधव यांनी हा उपक्रम राबविला पोलीस स्टेशनला जे काही काम होतं तक्रारी नोंदी आणि संपूर्ण काम कशाप्रकारे राबविले जाते याची संपूर्ण माहिती शालेय विद्यार्थ्यांना सौ स्मिता जाधव  यांनी दिली यातून समाजाला एक संदेश दिला आहे की पोलिसांचं विद्यार्थ्यांचं लहान मुलांचं एक विशिष्ट घट्ट नातं व्हावं आणि लहान मुलांची विद्यार्थ्यांची पोलिसांना बघून जी काही त्यांना एक भीती असते ती निघावी तसेच होत असलेले बाल अत्याचार विद्यार्थ्यांवरती होणारे अत्याचार याबद्दल बोलण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मॅडमनी केले

संबंधित पोस्ट