भारताचे संविधान आता ब्रेल लिपीतही उपलब्ध होणार
अंध व्यक्तींना हाताळण्यास सोपे जावे म्हणून ब्रेल लिपीतील संविधान पाच भागात तयार करण्यात येत असून त्यातील पहिल्या भागाचा प्रकाशन सोहळा, सावी फाऊंडेशन तर्फे रविवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2018
- 1778 views
देशात प्रथमच अंध बांधवांसाठी ‘भारताचे संविधान’ ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड, नाशिक’ या संस्थेतर्फे ब्रेल लिपीतील संविधान प्रकाशित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे (बार्टी) या संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे. बार्टीने दिलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीचे मराठी ब्रेल लिपीत लिप्यंतर करण्याची व ब्रेल मुद्रणाची जबाबदारी स्पर्शज्ञानचे स्वागत थोरात यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड, नाशिक’चे अध्यक्ष सतिश निकम यांनी दिली.
ब्रेल लिपीतील हे संविधान जास्तीत जास्त अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ‘बार्टी’ प्रमाणेच ‘सावी फाउंडेशन’ या संस्थेचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ‘दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाईंड, नाशिक’चे सचिव राजाराम गायकवाड यांनी सांगितले.
अंध व्यक्तींना हाताळण्यास सोपे जावे म्हणून ब्रेल लिपीतील संविधान पाच भागात तयार करण्यात येत असून त्यातील पहिल्या भागाचा प्रकाशन सोहळा, सावी फाऊंडेशन तर्फे रविवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या अनुसूचित जाती--जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थुल, ‘बार्टी’चे महासंचालक कैलास कणसे, राज्यघटनेचे अभ्यासक व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे, शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि ज्येष्ठ पत्रकार व चिंतन ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन थोरात हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती देऊन सावी फाउंडेशनच्या अध्यक्षा रश्मी पांढरे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या अपूर्व कार्यक्रमास हजर रहावे, असे आवाहन केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम