
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस दिली भेट!
मृत व्यक्तींबाबत दिल्या आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना तर जखमींच्या उपचारांबाबत केली विचारपूस!
- by Reporter
- Oct 20, 2022
- 182 views
रायगड(धर्मानंद गायकवाड)- अलिबाग- थळ येथील आरसीएफ कंपनीच्या एका प्लांटमध्ये आज सायंकाळी स्फोट झाला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
या घटनेबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आरसीएफ कंपनीस काल तात्काळ भेट दिली व तेथील परिस्थिती जाणून घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधितांना मृत व्यक्तींबाबत पुढील आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या तसेच जखमी व्यक्तींच्या उपचारांबद्दलची विचारपूस केली.
दरम्यान या स्फोटात दिलशाद आलम इद्रिसी- वय 29, ( कुर्ला पश्चिम), कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी फैजान शेख- वय 33, ( कुर्ला पश्चिम), कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी अंकित शर्मा, वय 27 आर.सी.एफ कर्मचारी अशी म्रुतांची नावे आहेत. तर जखमी अतिंद्र यांस कुर्ला पश्चिम (90% भाजल्हे असुन त्यास नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, जितेंद्र शेळके हे भाेनंग, नॅशनल बोन्स ऐरोली या इस्पितळात उपचारार्थ दाखल असुन साजिद सिद्दिक सलामती वय २३ हे कुर्ला पश्चिम, फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई, या इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
रिपोर्टर