पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना राष्ट्रपती पदक

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र रंगनाथ दौंडकर यांचा गुणवत्ता पूर्ण सेवेकरिता १३ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,

 बी.कॉम.पदवी घेतल्यानंतर रवींद्र दौंडकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रथम प्रयत्नात महाराष्ट्रात ५० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले पोलीस उपनिरीक्षक पदी त्यांची निवड झाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन गोवंडी येथे १९९६ सेवेत रुजू झाले आज तागायत मुंबई ठाणे व नवी मुंबई पुणे अँटी करप्शन ब्युरो ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यांनी आतापर्यंत २८ वर्ष कर्तव्य बजावले आहे त्यांनी एलएलबी व एल एल एम या पदव्याही संपादन केले आहेत पोलीस खात्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ५००  जास्त बक्षिसे व प्रशंसा पत्रासहित रोख रक्कम चार लाख रुपये पेक्षा जास्त मिळाली आहे त्यांनी अनेक गंभीर गुन्हे आपल्या कौशल्यपूर्ण तपासा मुळे उघडकीस  आणलेले आहेत त्यामुळे तत्कालीन स्वर्गीय गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफिसर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता एक मे २०१८ रोजी त्यांना पोलीस खात्यातील मानाचे पोलीस महासंचालक पदक मिळाले आहे पोलीस खात्यामधील राष्ट्रपती पोलीस पदक हा सर्वोच्च सन्मान आहे रवींद्र दौंडकर यांच्या सेवा कार्याला उचित असा बहुमान मिळाल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित पोस्ट