
रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांची बदली! रायगड नवीन पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे!
- by Reporter
- Oct 15, 2022
- 408 views
रायगड:(धर्मानंद गायकवाड) रायगड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक भाप्रसे अशोक दुधे यांची नुकताच बदली झाली असुन त्यांचा जागी रायगडचे नवीन पोलिस अधिक्षक म्हणुन सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती झाली आहे.
रायगड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक गुन्हे यशस्वीपणे उघड केले आहे, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना समज़ुन घेणारे अधिकारी म्हणुन पोलिस अधिक्षक दुधे यांची ओळख आहे, मात्र त्यांचा कार्यकाल संपल्याने अखेर काल ब्रुहन्मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदावर काम करीत असणारे सोमनाथ घार्गे यांची रायगडचे पोलिस अधिक्षक म्हणुन नियुक्त करण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव व्यकंटेश भट यांचा सहीचा आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान नवीन रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलिस खात्यात डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणुन ओळख असल्याने त्यांचा नियुक्तीचा रायगडला मोठा फायदा होणेचे बोलेल जात आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होण्याचे बोलेल जात आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यात नव्याने नियुक्त झालेले रायगड पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे कसे रायगडचा पोलिस खात्यात आपल्या कामाचा ठसा उमटवतात याकडे रायगडकरांचे लक्ष लागुन राहीले आहे.
रिपोर्टर