जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक पदी बबनराव बारगजे यांची निवड

पनवेल :जय गोपीनाथ प्रतिष्ठानची त्रैमासिक बैठक कलंबोली मधील भाजपा कार्यालय सेक्टर ८ येथे संपन्न झाली, प्रमुख मार्गदर्शक मा.बबनजी बारगजे साहेब यांच्या अध्यक्षते खाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे, उपाध्यक्ष आनंद ठोंबरे, सचिव हनुमंत विघ्ने, सहसचिव ऋषिकेश सांगळे, सदस्य देविदास बुधवंत, नवीमुंबई उपाध्यक्ष पप्पु सोनवणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल घोळवे, उरण तालुका अध्यक्ष अर्जुन गीते, सदस्य हरिभाऊ दहिफळे, सुमीत कोळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, प्रमुख मार्गदर्शक बबनजी बारगजे साहेब यांनी जय गोपीनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून वृक्ष रोपण व अनेक सामाजिक उपक्रम राबविण्या बाबत मार्गदर्शन केले . जय गोपीनाथ प्रतिष्ठान ही गेली पाच वर्षे संस्था मुंबई नवी मुंबई व महाराष्ट्रभर काम करीत आहे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे .  या संस्थेत नुकतेच 80 जी हे प्रमाणपत्र मिळाले आहे. यापुढे गोरगरीब गरजूंना या संस्थेमार्फत मदत करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष सुभाष आंधळे व मार्गदर्शक बबनराव बारगजे यांनी बोलून दाखवला . येत्या दसर्याला रामगड या ठिकाणी वृक्षारोपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे . वृक्ष लागवड करून त्याचे जतन करणे व निसर्गाचे संवर्धन करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे . या संस्थेस दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहन माननीय बबन बारगजे यांनी केले आहे.  ऋषिकेश सांगळे यांनी आभार मानून बैठकीचा समारोप केला.

संबंधित पोस्ट