राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाशिक विमानतळावर आगमन;पालकमंत्री, कृषीमंत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले स्वागत

नाशिक : के . रवि ( दादा ) महाराष्ट्रचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज एक दिवसाच्या भेटीकरिता  नाशिक (ओझर) विमानतळावर आगमन झाले असून राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे,  यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. 


यावेळी  कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. लीना बनसोड, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले.त्यानंतर राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी रवाना झाले.



महाराष्ट्रचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारिंच्या हस्ते राज्य शासनाचे कृषी रत्न, कृषी भूषण यांसह 2017, 2018 व २०१९ या वर्षांकरिता विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरीत केले जाणार आहे.

संबंधित पोस्ट